गणेशोत्सव विशेष
देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर
गणेश टोक मंदिर, गंगटोक
गणेशोत्सवा निमित्त देशातील श्रीगणेशाची लहानमोठी सर्व मंदिरं भाविकांच्या वर्दळीने खुलुन गेली आहेत. सगळ्या गणेश मंदिरांत चैतन्य ओसंडून वाहत आहे. देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिरं या विशेष मालिकेत आज आपण भारताच्या ईशान्य टोकावर असलेल्या सिक्किम राज्यातील गंगटोक येथील गणेश मंदिराची माहिती घेणार आहोत.
मुळात सिक्किम हाच निसर्गाने नटलेला समृद्ध परिसर .त्यात चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचा उत्सव म्हटल्यावर रंगांची उधळण न झाली तरच नवल. गंगटोकचं गणेश मंदिराचाही याला अपवाद नाही. या मंदिरांत वर्षभर भाविक आणि पर्यटक यांची रेलचेल असते .सध्या तर गणेशोत्सव असल्याने भाविकांची आणि पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. गणेश टोक नावाच्या या मंदिरामुळे या गावाचे नाव ‘गंगटोक’ पडले आहे.
इतिहास
‘टोक’ या शब्दाचा खरा अर्थ स्थानिक भाषेत ‘मंदिर’ असा आहे म्हणून त्याचे भाषांतर गणेश मंदिर असे केले जाते. १९५२-५३ मध्ये अप्पासाहेब पंत येथे भारत सरकारच्या विदेश मंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकारी असतांना त्यांनी हे मंदिर बांधले. गणेश टोक मंदिर गंगटोक हे विलक्षण जागृत हिंदू मंदिर आहे. श्रीगणेशाची पूजा किंवा दर्शना पेक्षा पर्यटकांना येथून दिसणार्या बर्फाच्छादित कांचनजंगा टेकड्या आणि गंगटोक शहराचे विहंगम दृश्य याचेच सर्वाधिक आकर्षण असते.
मंदिरा पर्यंतचा रस्ता रंगीबेरंगी झेंडे यांनी शोभिवंत बनविलेला आहे. मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले आहे.मंदिरांत जाण्यासाठी लाल रंगात रंगविलेल्या पायर्या आणि रंगीत लोखंडी ग्रील्स लावलेले आहेत. मंदिराच्या आसपास चा एरिया अतिशय प्रसन्न आणि उत्साहवर्धक आहे.
गणेश टोक गणेश मंदिर हे अगदी लहान आहे.वरच्या मंदिरा पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पायऱ्या चढून जावे लागेल.परिसर कमालीचा स्वच्छ आणि मनमोहक आहे. मंदिराचे गर्भगृह खुपच लहान आहे.मात्र मंदिरा भोवती निसर्ग सौदर्य पाहण्यासाठी काचेच्या गॅलरी केलेल्या आहेत. काचेच्या पॅनल्ससह वॉचिंग लाउंज आणि चांगली दृश्ये पाहण्यासाठी बाल्कनी आहे. बाल्कनीतून, तुम्ही कांचनजंगासह बर्फाच्छादित पर्वत आणि टेकड्या पाहू शकता.फोटो काढ़ण्यासाठी ही एक आदर्श जागा आहे.
मूर्ती
येथे भगवान विनायकाची प्रसन्न मूर्ती आहे. येथे येवून श्री गणेशाचे दर्शन घेणे हाच लाइफ टाइम अनुभव असतो.येथून निसर्गाच्या कुशीत विसवलेले गंगटोक शहर, हिमालयातील कंचनजंगा ही बर्फाच्छादित हिमशिखरे तसेच बराच दूर असलेला ‘सिनी ओलचू’ हे पर्वत मनसोक्त पाहता येतात.
गणपती बाप्पाचं हे मंदिर आकाराने लहान आहे परंतु त्याचे छत भरपूर मोठे आहे. आसपासचा नजारा पाहण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे.
सण
गणेश चक्रवर्ती, गणेश उत्सव हे सण विशेष उत्साहात साजरे केले जातात.
जवळपासची आकर्षणे
१) Tsomgo अभाव (गंगटोक पासून सुमारे 35 किमी) २) बाबा मंदिर ३) नथुला पास ४) हनुमान टाक ५) झाकरी धबधबा बनवा ६)रांका मठ
कसे पोहोचायचे
विमानाने: पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळावर विमानाने यावे . राज्यात कोणतेही मोठे रेल्वे स्टेशन नाही. सिलीगुडी किंवा जलपाईगुडीला येथून ट्रेनने सिक्कीमला जाता येते रस्त्याने: गणेश टोक हे गंगटोक शहरापासून ७ किमी अंतरावर आहे आणि स्थानिक टॅक्सी किंवा बाईक वापरून सहज पोहोचता येते.
मंदिराच्या वेळा
गणेश टोक मंदिर, गंगटोक
स्थान : जवाहरलाल नेहरू रोड, अरिथांग, गंगटोक, सिक्कीम 737103
दर्शनाची वेळ : सकाळी 06.00 ते संध्याकाळी 07.00 पर्यंत.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम हंगाम : मार्च ते जून
देशांतील सुप्रसिद्ध गणेश मंदिरं-११
संकलन व सादरकर्ते- विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७
Ganeshotsav Famous Ganesh Temple Gangtok Vijay Golesar