मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घराघरातील लाडका बाप्पा आज गावी जात आहेत. विसर्जन मिरवणुकांमध्ये उदंड उत्साह पहायला मिळत आहे. ठिकठिकाणच्या सार्वजनिक बाप्पांची जंगी मिरवणूक निघत आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सवावरही त्याचा परिणाम झाला. यंदा मात्र सर्व मळभ दूर झाल्याने अभूतपूर्व उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. विसर्जन मिरवणुकीत त्याची मोठी झलक पहायला मिळत आहे. मुंबईतील विविध उपनगरांसह राज्यातील विविध शहरे आणि गावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जनाला प्रारंभ झाला आहे. ढोल, ताशा यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जात आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीचा बघा हा अप्रतिम व्हिडिओ
https://twitter.com/dineshmourya4/status/1568114264627617796?s=20&t=R-C0OgMm5CfbNEW_8miUQQ
Ganesh Visarjan Miravnuk Start Video