सुदर्शन सारडा
नाशिक – नाशिक पूर्व विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांचे नाव साधर्म्य असलेल्या व्यक्तीला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपकडून थेट २० लाखाची ऑफर देण्यात आल्याची ऑ़डिओ क्लीप व्हायरल झाली आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गिते यांनी थेट पत्रकार परिषद याबाबतची माहिती दिली. या व्हिडिओमध्ये भाजपचा एक पदाधिकारी मी दोन उमेदवारांचे काम करतो आहे. तुम्ही फॅार्म भरा तुम्हाला २० लाख देऊ, त्यानंतर समोरचा गणेश गिते हा सिन्नर येथील व्यक्ती मी फॅार्म भरतो. पण, त्यानंतर मला माघारीच्या वेळी त्रास होऊ नये. त्याची व्यवस्था तुम्ही करा असा संवाद आहे.
बघा गणेश गिते यांची पत्रकार परिषद