श्रीगणेश चतुर्थी महात्म्य
प्रत्येक वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी श्री गणरायांचे दहा दिवसा करता आगमन होते. श्री गणेशाचा हा महाउत्सव संपूर्ण जगभरात जल्लोषात साजरा केला जातो. गणपती अथर्वशीर्ष मध्ये ”त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि त्वमेव केवलम करतासी त्वमेव केवलम हरतासी त्याचप्रमाणे त्वम विज्ञानमयोसी” अर्थात जीवनाचे तत्त्व तूचआहेस जीवनाचा कर्ताधर्ता तुच आहेस. त्याचप्रमाणे तूच ज्ञान आहेस आणि विज्ञानही आहेस असे श्री गणेशाचे वर्णन केले आहे. यंदा ३१ ऑगस्ट, बुधवार रोजी श्री गणरायाचे आगमन होऊन दहा दिवसा करता प्रतिष्ठापना होणार आहे…
श्री गणेश पूजा विधी व स्थापना मुहूर्त
भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी सुरू होते – ३० ऑगस्ट दुपारी ३.३३ ते भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी समाप्ती – ३१ ऑगस्ट, दुपारी ३.२२ पर्यंत
गणेश जी स्थापना मुहूर्त – सकाळी ११.०५ – दुपारी १.३८ (३१ ऑगस्ट, बुधवार)
विजय मुहूर्त – दुपारी २.३४ – ३.२५
अमृत काल मुहूर्त – संध्याकाळी ५.४२ ते ७.२०
संधिप्रकाश मुहूर्त – सायंकाळी ६.३६ -७.००
पूजा विधी साहित्य
हळद, कुंकू, अक्षता, जास्वंदाचे लाल फुल, सुट्टी फुले, हार, दुर्वा, जुडी, कलश, विड्याची पाने, सुपारी, हळकुंड, खारीक, गुळ, खोबरे, पत्री, नारळ, निरंजन, फुल वात, अगरबत्ती, सुवासिक अत्तर, लाल वस्त्र ……
थोडक्यात पूजा विधी
सर्वप्रथम पाटावर लाल वस्त्र ठेवून त्यावर अक्षता वहाव्यात. त्यावर गणपती मूर्ती ठेवावी. मूर्तीच्या अंगावर वस्त्र द्यावे. मूर्तीसमोर विड्याच्या पानामध्ये खारीक, हळकुंड, सुपारी, गुळ, खोबरे ठेवावे. मूर्तीच्या उजव्या बाजूला कलशामध्ये पाणी घेऊन त्यावर विड्याची पाने लावून नारळ ठेवावा. असा मंगलकलश तयार करावा. मूर्तीला हळद-कुंकू वहावे. डोक्यावर लाल फुल अर्पण करावे. सोंडेमध्ये दुर्वाची जोडी ठेवावी. हार घालून नंदादीप लावावा. त्यासोबत सुगंधी अगरबत्ती लावावी. फुलाने मूर्तीवर अत्तर शिंपडावे. ओम गं गणपतये नमः जप करावा. गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. गणपतीची व देवीची आरती करावी. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा…..
गणेशोत्सवादरम्यान अनेक कुटुंबात गौरी अर्थात महालक्ष्मी आगमन होते. यंदा श्री गौरींचे आगमन ३ सप्टेंबर रोजी होऊन ४ सप्टेंबर रोजी गौरीपूजन, महाप्रसाद व ५ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे..
इंडिया दर्पण च्या सर्व वाचकांना गौरी गणपती महाउत्सवाच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया.
https://twitter.com/BhavBrahma/status/1564499653638631424?t=MB4GmbQnjDsEHKRPyhdezg&s=19
Ganesh Chaturthi Bappa Pratishthapana Muhurta Pujavidhi