इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्माची कास धरणं आणि त्याच्याशी लग्न करणं हा अलीकडे ट्रेंड झाला आहे. यात कलाकारही मागे नाहीत. अशाच कारणासाठी सध्या अभिनेत्री गहना वशिष्ठ चर्चेत आहे. तिने गुपचूप लग्न केल्याची चर्चा असून तिने इस्लाम धर्म स्वीकारल्याची देखील चर्चा आहे.
गहना वशिष्ठचे नाव पॉर्न व्हिडीओ प्रकरणात राज कुंद्रासोबत घेण्यात आले होते. त्यानंतर आता गहना तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून गहना फैजाम अन्सारीला डेट करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर ते दोघे अनेकदा एकत्र फिरताना दिसले होते. आता गहनाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत गुपचूप लग्न केल्याचे सांगितले आहे. त्यांचा विवाह सोहळा रितीनुसार पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, गहनाने लग्नानंतर इस्लाम धर्म देखील स्वीकारला आहे.
कोण आहे फैजान अन्सारी?
फैजान अन्सारी हा सोशल मीडिया स्टार आणि अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वी फैजान अॅमेझॉन प्राइम या मिनी टीव्हीच्या रिॲलिटी शो ‘डेटबाजी’मध्ये दिसला होता.
कोण आहे गहना वशिष्ठ?
बोल्ड सीन्स आणि फोटोशूटमुळे गहना चर्चेत असते. ‘मिस आशिया बिकिनी’ पुरस्कार मिळवणाऱ्या गहनाने आजवर अनेक जाहिराती, हिंदी आणि तेलुगु सिनेमांमध्ये काम केले आहे. असे असले तरी ‘गंदी बात’ या सीरिजने तिला लोकप्रियता मिळवून दिली. काही दिवसांपूर्वी तिने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या ओटीटी प्लॅटफॉर्म ३ अश्लील वेब सीरिजमध्येही काम केले.