रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आज आहे श्री गजानन महाराज प्रकट दिन; असे आहे त्याचे महात्म्य

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 23, 2022 | 5:44 am
in मुख्य बातमी
0
gajanan maharaj

 

संत गजानन महाराज प्रकट दिन महात्म्य

माघ वद्य सप्तमी दिवशी संत गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस आज, बुधवारी २० फेब्रुवारी रोजी आला आहे. यानिमित्त आपण या दिनाचे महात्म्य जाणून घेणार आहेत………

Dinesh Pant e1610813906338
पंडित दिनेशपंत
व्हॉटसअॅप – 9373913484

अवघ्या विश्वाला गणगण गणात बोते हा मंत्र देणाऱ्या महान संत वेदशास्त्रसंपन्न योगी श्री गजानन महाराज यांचे प्रथम प्रकट दर्शन १८७८ मध्ये माघ वद्य सप्तमी दिवशी मध्यान प्रहरात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे   झाले. येथील पातुरकरांच्या घरी असलेल्या धार्मिक कार्यक्रमात मधील जेवणावळीच्या उष्ट्या पत्रावळी समोरील झाडाखाली टाकलेल्या होत्या. त्या पत्रावळी वरील उष्टे अन्न खात बसलेले संत गजानन महाराज हे प्रथम बंकटलाल अग्रवाल व दामोदर पंत कुलकर्णी यांच्या दृष्टीस पडले. म्हणून हा दिवस संत गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून संपूर्ण जगभरात विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात साजरा केला जातो.
महाराजांचे एकूणच तेजपुंज व्यक्तिमत्त्व व हावभाव पाहून हे कोणीतरी महान योगी साधुसंत आहेत याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी पातुरकरांच्या घरून मिष्टान्न भोजनाचे ताट वाढून आणून महाराजांपुढे ठेवून त्यांना खाण्याची विनंती केली. महाराजांनी त्या ताटातील सर्व पदार्थ एकत्र करून खाण्यास सुरुवात केली. जेवण झाल्यावर येथील गडूळ पाणी पिऊन टाकलं जणू काही चांगले वाईट हे फक्त आपल्या मनाचे खेळ असून परमेश्वर निर्मित सर्व चांगलेच आहे, असा संदेश महाराजांनी आपल्या कृतीतून दिला.

या संत पुरुषांची आपण विचारपूस करावी पाया पडून दर्शन घ्यावे, या उद्देशाने बंकटलाल दामोदर पंत महाराजांच्या जवळ जाण्याअगोदरच महाराज तेथून निघून गेले. बंकटलाल याने महाराजांच्या दर्शनाचा ध्यास घेतला. तहान भूक विसरून ते महाराजांचा शोध सर्व परिसरात घेत फिरत होते.
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. अन्नाची नासाडी करू नये. ताटात वाढलेले पूर्ण अन्न भक्षण करावे, असाही संदेश  महाराजांनी आपल्या कृतीतून दिला. पुढे शेगाव हीच आपली कर्मभूमी ठेवून संत गजानन महाराज यांनी आपल्या लाखो भक्तांना आपल्या योगिक सामर्थ्याच्या असंख्य अनुभूती दिल्या. मिष्टान्न भोजनाचा बडेजाव न करता भाकरी, पिठलं व कांदा अशा सर्व सर्वसामान्यांच्या आहारास महाराजांनी कायम प्राधान्य दिले. आजही लाखो भक्त पिठलं, भाकरी व कांदा हाच नैवेद्य महाराजांना अर्पण करतात.

खरा भक्तिमार्ग सेवा मार्ग काय असतो हे महाराजांनी शिकवले. भास्कर पाटील, बंकटलाल अग्रवाल, दामोदर कुलकर्णी, भक्त जानराव जानकीराम, चंदू मुकीन, गणू जवऱ्या, हरी पाटील, ब्रह्मगिरी हरिदास टाकळीकर, भक्त बाळकृष्ण सुकलाल, लक्ष्मण घूडे, भक्त पितांबर गंगाभारती, भक्त पुंडलिक माधवनाथ, भक्त कवर, भक्त बाईजा बाई, भक्त बापूना यासह लाखो भक्तांना संत गजानन महाराजांची कृपादृष्टी लाभली.
भक्तांच्या उद्धारासाठी शेगाव, त्र्यंबकेश्वर, नाशिक, ओंकारेश्वर, नागपूर, पंढरपूर यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या भक्तांनाही महाराजांचा प्रत्यक्ष सहवास व कृपादृष्टी लाभली. महाराजांच्या योगिक सामर्थ्याची अनुभूती देखील अनेक प्रसंगांमधून भक्तांनी अनुभवली. भक्तिमार्ग, धार्मिकता, सेवाभाव, वेदशास्त्र त्याचप्रमाणे अन्नपूर्णेच्या महात्म्याचा गण गण गणात बोते हा गुरुमंत्र आपल्या जगभरातील लाखो भक्तांना देऊन भक्तांच्या हृदयात आजन्म स्थान मिळवले. हे महान योगी संत गजानन महाराज ८ सप्टेंबर १९१० ऋषिपंचमी या दिवशी शेगाव येथे समाधिस्थ झाले.
शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान आणि त्यांची भारतभरातील सर्व मंदिरे ही भक्तीभाव व सेवाभाव याचा लाखो भक्तांसाठी एक आदर्श म्हणून कार्यरत आहेत….

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज होणार घोषणा

Next Post

आज आहे संत गाडगे महाराज यांची जयंती; जाणून घेऊया त्यांच्या कार्याविषयी..

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
gadge maharaj1

आज आहे संत गाडगे महाराज यांची जयंती; जाणून घेऊया त्यांच्या कार्याविषयी..

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011