नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी सद्गुरू श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा होणार आहे.
तिडकेनगर-जगतापनगर येथे सन २००८ पासून या सोहळ्यास सुरुवात झाली, हे त्याचे १८वे वर्ष आहे. यंदा हा सोहळा उंटवाडीच्या जगतापनगर-तिडकेनगर येथील सागर दूध डेअरी-सनराईज सुपर मार्केटसमोर, आकाश लाईफस्टाईल-गुनीना बिल्डिंगच्या मागे संपन्न होईल. बुधवारी श्री गजानन महाराज मूर्ती आगमन सोहळा होईल. गुरुवारी, प्रकट दिनी दुपारी ३ वाजता श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तिडकेनगर, कर्मयोगीनगर, गोविंदनगर, कालिका पार्क, सुंदरबन कॉलनी, कृष्णबन कॉलनी, सद्गुरुनगर, पांगरे मळा, बडदेनगर, जुने सिडको, जगतापनगर, पाटीलनगर, हेडगेवारनगर, उंटवाडी भागासह शहरातील भाविकांनी महाआरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, वंदना पाटील, रवींद्र सोनजे, निंबा अमृतकर, प्रभाकर खैरनार, वसंतराव फडके, संजय टकले, विशाल भदाणे, विनोद पोळ, दिलीप दिवाणे, दिलीप रौंदळ, यशवंत जाधव, नीलेश ठाकूर, अशोक पाटील, भास्कर देसले, सतीश मणिआर, मंदार सडेकर, कुमार पवार, प्रथमेश पाटकर आदींनी केले आहे. याप्रसंगी संध्या छाया आणि गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शिवाजी मेने, मनोज वाणी, सुनील सोनकांबळे, आनंदा तिडके, किरण काळे, दीपक दुट्टे, संदीप कासार, परेश येवले, अनंत संगमनेरकर, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, राहुल कदम, सचिन जाधव, योगेश येवला, भूषण देशमुख, राहुल काळे, राहुल पाटील, वैभव कुलकर्णी, तेजस अमृतकर, प्रथमेश पाटील, मंदार जोशी, राहुल ठाकरे, नंदकुमार कुर्हा्डे, मिलिंद घन, मिलिंद येवला आदी परिश्रम घेत आहेत.