मुंबई – एकेकाळी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत म्हणून नोंद झालेले अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना गेल्या तीन आठवड्यांमध्ये मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे श्रीमंतांच्या यादीत आता ते २१ व्या स्थानावर घसरले आहेत.
गेल्या १७ दिवसांमध्ये अदानी यांना १७.३ अरब डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख २८ हजार ७२० कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला. गेल्या महिन्यात त्यांची संपत्ती १७ अरब डॉलरपर्यंत पोहोचली होती, मात्र अदानी समूहाच्या शेयर्समध्ये लागोपाठ घसरण होत असल्यामुळे ते आता Bloomberg Billionaires Index मध्ये टॉप २० च्या बाहेर फेकले गेले आहेत. आता ५९.७ अरब संपत्तीसह के २१ व्या क्रमांकावर आहेत. १४ जूनला प्रकाशित एका बातमीने गौतम अदानी यांच्या आयुष्यात एवढ्या मोठ्या घडामोडी घडवून आणल्या, हे महत्त्वाचे.
गुरुवारी दुपारपर्यंतसुद्धा त्यांना १.४९ अरब डॉलरचा झटका बसला होता. एवढेच नाही तर अदानी समूहाच्या यादीतील ६ लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी एन्टरप्रायझेस, अदानी पोर्ट्स या कंपन्यांचा यात समावेश आहे. Bloomberg Billionaires Index यांच्यानुसार, अमेझॉनचे जेफ बेजोस जगातील सर्वांत श्रीमंत आहेत.