गडचिरोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय कार्यालय म्हटले की, अधिकाऱ्यांनी कर्मचारी जनतेच्या कामाला विलंब लावतात. वास्तविक पाहता ते जनसेवक असतात. मात्र कामाला उशीर कसा होईल, याकडे त्यांचा कल असतो, असे म्हटले जाते. त्याचा अनेक जिल्हा, तालुका, आणि गावांमध्ये देखील प्रत्यय येतो. अगदी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद तसेच मंत्रालयातही शासकीय कर्मचारी कामासाठी विलंब लावतात, असे दिसून येते. मुंबईत जी परिस्थिती आहे तीच गडचिरोलीत दिसून येते.
नंदुरबार असो की कोल्हापूरला अशाच प्रकारे ढिसाळपणे, विलंबाने व थंडपणे काम चालते असा नागरिकांचा अनुभव आहे. गडचिरोली जिल्ह्यातही असाच प्रकार घडला. काही अधिकारी मात्र चांगल्या प्रकारे काम कसे होईल, शिस्तीत आणि वेळेवर काम कसे होईल, याकडे लक्ष देतात. मात्र जेव्हा त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत, तेव्हा त्यांना कारवाईचा बडगा उगारावा लागतो. गडचिरोलीतील एका अधिकाऱ्यानेही अशाच प्रकारे कारवाई केली, मात्र त्यासाठी त्यांनी चक्क स्वतःच्याच कार्यालयाला कुलूप ठोकले.
तरीही सुधारणा होत नव्हती
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी अतिदुर्गम आणि मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. यात अहेरी उपविभागीय कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणा, दफ्तरदिरंगाई प्रकरणी निलंबनाची वेळ आली आहे. दुर्गम भागातून अनेक लोक सरकारी कामासाठी कार्यालयात येत असतात. मात्र, त्यांना कामासाठी हेलपाटे मारावे लागतात. अहेरी उपविभाग कार्यालयात मागील काही वर्षांपासून परिसरातील नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे कार्यालयीन कामासाठी चकारामाराव्या लागत होत्या. त्यामुळे अनेक कामे थांबली होती तसेच जनतेच्या प्रश्नांनाही विलंब होत असल्याने विकास कामे मार्गी लागत नव्हती होती. महिनाभरापूर्वी वैभव वाघमारे हे उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू होताच कार्यालयाला शिस्त लावण्याच्या बराच प्रयत्न केला. परंतू, कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे आता वेगळाच मार्ग अवलंबण्याचे त्यांनी ठरविले.
दोघांना कारवाईतून वगळले
कर्मचारी वेळेवर कामात येत नाही तर मग कार्यालयात उघडे कशाला ठेवायचे असा विचार करून उपविभागीय अधिकारी वाघमारे यांनी स्वतःच्याच कार्यालयाला कुलूप ठोकून शिपाई आणि नायब तहसीलदार यांना वगळून इतर सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. कारण शिपाई आणि नायब तहसीलदार हे वेळेत उपस्थित असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र अचानक केलेल्या वेगळ्या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमधून उपविभागीय अधिकारी वाघमारे यांचे कौतुक करण्यात येत आहे. दफ्तरदिरंगाई, निष्काळजीपणा आणि अकार्यक्षमतेमुळं कार्यवाही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांना भीती राहील. तसेच कामात शिस्त लागेल. लोकांची कामे वेळेत होतील असे वाघमारे यांचे म्हणणे आहे. मात्र आता यात खरेच बदल होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे अवलंब करावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.
The Sub Divisional Officer locked his own office
Gadchiroli Deputy Collector Peoples Work Government