इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अतिशय बिकट अवस्था निर्माण झाली आहे. अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. राज्य आपत्ती बचाव दलाच्यावतीने तेथे अतिशय सक्रीयपणे बचावकार्य सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि दलाच्यावतीने १७ जणांना वाचविण्यात आले आहे. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे अहेरी तालुक्यात हे बचावकार्य राबविण्यात आले. त्यात खासकरुन लहान मुलांचा समावेश होता. पाण्याने वेढलेल्या भागातून सर्व नागरिकांची सुटका करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्याबद्दल दलासह पोलिसांचे आभार मानले आहेत. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1547191977124691971?s=20&t=DxLu81VaeQuKS7WcOO8Y6A
Gadchiroli District Rescue Operation Flood Disaster Video