नवी दिल्ली – अनियंत्रित मधुमेह आणि जास्त वेळ आयसीयूमध्ये राहणार्या कोरोनाबाधितांमध्ये म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने केंद्र सरकारकडून नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. दुर्लक्ष केल्यास हा संसर्ग जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे सुरक्षिततेसाठी काही पावले उचलणे आवश्यक आहेत. तपासणी, निदान आणि व्यवस्थापन या आधारे आरोग्य मंत्रालय आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्याकडून नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.
ही आहेत कारणे
– अनियंत्रित मधुमेह- स्टेरॉयइडमुळे इम्युनोसप्रेशन
– अधिक काळ आयसीयूमध्ये राहणे
—
अशी करावी सुरक्षा
– धूळीच्या ठिकाणी मास्कचा वापर
– माती आणि खोदकाम करताना शरीराला बूट, ग्लोव्ह्जने पूर्ण झाकावे
– स्क्रब बाथद्वारे स्वच्छतेवर लक्ष देणे
—
ही आहेत लक्षणे
– नाक जाम होणे, नाकातून काळे किंवा निळा स्त्राव होणे
– गालाचे हाड दुखणे
– चेहर्याचा एक भाग दुखणे, किंवा सूज येणे
– दात दुखणे किंवा दात तुटणे
– जबडा दुखणे
– वेदनेसह अस्पष्ट दिसणे किंवा दोन आकृती दिसणे
– छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास
—
काय करावे
– रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करावे
– मधुमेही आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी रक्तातील ग्लुकोजकडे लक्ष द्यावे
– स्टरॉयडचा वापर करताना वेळ आणि डोसकडे लक्ष द्यावे
– प्रतिजैवक आणि बुरशीविरोधी प्रतिजैवक औषधांचा वापर लक्षपूर्वक करावा
—
काय करू नये
– लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये
– बुरशी संसर्गाची चाचणी करण्यास मागेपुढे पाहू नये
– वेळेवर उपचार गरजेचे, त्यामुळे वेळ वाया घालू नये
—
निदान झाल्यावर हे लक्षात ठेवा
– मधुमेहावर नियंत्रण ठेवा
– स्टेरॉइड घेताना मात्रा कमी करावी आणि लवकरच वापर करणे बंद करावे
—
महाराष्ट्र-गुजरातमध्ये रुग्ण
म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्याचे अनेक रुग्ण आढळले आहेत. या संसर्गामुळे बाधित झालेल्या रुग्णांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यापैकी दृष्टी जाण्याचा सर्वाधिक धोका आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या संसर्गामुळे बाधित झालेले रुग्ण आढळले आहेत. गुजरामधील सुरत येथे ५० रुग्णांवर उपचार सुरू असून ६० रुग्णांचा उपाचार बाकी आहे. त्यापैकी ७ रुग्णांनी डोळ्याची दृष्टी गमावली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ८ रुग्ण अंध झाले आहेत. हे सर्व रुग्ण नुकतेच कोरोनातून बरे झाले होते. या आजारावर २०० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.