नवी दिल्ली – हरवल्याचा व्यक्तीचा शोध पोलीस घेतात, परंतु काही वेळा अत्यंत विपरीत घटना घडते असाच प्रकार उत्तर प्रदेशात घडला. कारण औरैयामध्ये एका मुलीवर अंत्यसंस्कार केलेल्यावर ती मुलगी गुरुग्राममध्ये चक्क जिवंत सापडली. हे असे कसे घडले?
याबाबत सुत्रांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील औरैया कोतवालीतील एका गावातून एक तरुणी बेपत्ता झाली होती. भडौरा गावात राहणाऱ्या अजयच्या विरोधात कुटुंबाने मुलीचा शोध घेतल्यानंतर हरवल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस मुलीचा शोध घेत होते, दरम्यान पोलिसांना एका मुलीचा मृतदेह गावाबाहेर यमुना नदीच्या काठावर सापडला. यावर पोलिसांनी बेपत्ता मुलीच्या नातेवाईकांना बोलावून तिची ओळख पटवली. लगेच नातेवाईकांनी मृतदेह घेऊन अंतिम संस्कार केले.
शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले की, अंत्यसंस्कार केलेल्या व्यक्तीचे वय 10 ते 12 वर्षांच्या दरम्यान आहे, तर बेपत्ता झालेली मुलीचे वय तर 22 वर्षे होते. ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पोलिसांत खळबळ उडाली. त्यानंतर मोबाईलचे लोकेशन कळल्यानंतर पोलिसांनी गुरूग्राममधून बेपत्ता तरुणीचा सुगावा घेऊन तिला शोधून काढले. आता अंत्यसंस्कार केलेल्या आणि नदीकाठावर सापडलेला मृतदेह कोणत्या मुलींचा होता? ही पोलिसांसाठी डोकेदुखी बनली आहे. आता या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.