मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्जबुडव्या हिरे व्यापारी नीरव मोदीच्या पुणे येथील फ्लॅटला ग्राहक मिळत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर कर्ज वसूली न्यायाधिकरण प्रथमचे मुंबई येथील अधिकारी आशू कुमार यांनी मोदीच्या दोन्ही फ्लॅटची किंमत कमी निर्धारित करून पुन्हा एकदा लीलाव प्रक्रिया राबविण्याचा विचार केला आहे.
देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव करून २० मार्च २०२३ पर्यंत पीएनबी बँकेला ११ हजार ७७७ कोटींच्या कर्जाचा काही हिस्सा वसूल करायचा आहे. फेब्रुवारी पर्यंत पीएनबीचे एकूण कर्ज ११ हजार ६५३ कोटींचे होईल, ज्यामध्ये २० मार्च ला १२४ कोटींची आणखी भर पडणार आहे. लिलाव पार पडत असलेल्या प्रॉपर्टीमध्ये पुणे येथील फ्लॅट नं. १६०१ आणि १६०२, एफ १ इमारत, १६ वा मजला, युपणे हाऊसिंग स्किम, हडपसर येथील दोन फ्लॅटचा समावेश आहे. या फ्लॅटचे क्षेत्रफळ हे ३९८ स्क्वे.मी. आणि ३९५ स्क्वे. मी. असे आहे. तर या फ्लॅटची किंमत अनुक्रमे ८.१० आणि ८.०४ कोटी अशी आहे. २० मार्च रोजी दरामध्ये घट करुन पुन्हा लिलाव केला जाईल.
११ हजार ५०० कोटींचा घोटा
नीरव मोदीवर ११ हजार ५०० कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळ्याचा आरोप आहे. हे पैसे वसूल करण्यासाठी पीएनबीने मोदीच्या १८ कोटी रुपयांचे दोन फ्लॅट लिलावाच्या माध्यमातून विकण्याचा प्रयत्न करत आहे.
यांना बजावली नोटीस
डीआरटीने ९ फेब्रुवारी रोजी डिफॉल्टर कंपनी स्टेलर डायमंड्स, सोलर एक्सपोर्ट्स, डायमंड आर युएस, एएनएम एंटरप्राइजेस प्रा. लि., एनडीएम एंटरप्राइजेस प्रा. लि. तसेच या कंपन्यांचे मालक, प्रवर्तक नीरव डी. मोदी, अमी नीरव मोदी, रोहिनी न. मोदी, अनन्या नी. मोदी, अप्श नी. मोदी, पुर्वी मयांक मेहता, दीपक के. मोदी, निशाल डी. मोदी आणि नेहल डी. मोदी यांना नोटीस पाठविली आहे.
Fugitive Nirav Modi Pune Flat Auction Price