इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तब्बल १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी आणि फरार व्यापारी मेहुल चोक्सी याला इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसच्या यादीतून काढून टाकले आहे. त्यामुळे आता चोक्सी हा जगभर कुठेही फिरु शकणार आहे. आपले नाव या यादीतून वगळण्याचे आवाहन चोक्सीने केले होते. त्यावर इंटरपोलने निर्णय घेतला आहे. मात्र, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि चोक्सीची कायदेशीर टीम यांनी यासंदर्भात काहीही प्रतिक्रीया दिलेली नाही.
जानेवारी २०१८ मध्ये, मेहुल चोक्सी हा भारतातून फरार झाला आहे. त्यानंतर सुमारे १० महिन्यांनंतर, इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. देश सोडल्यानंतर चोक्सीने अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व घेतले. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या सीबीआयच्या याचिकेला चोक्सीने आव्हान दिले.
हे प्रकरण राजकीय षडयंत्र असल्याचे त्याने म्हटले होते. भारतातील तुरुंगांची स्थिती, वैयक्तिक सुरक्षा आणि आरोग्य यासारख्या समस्यांबाबतही त्याने प्रश्न उपस्थित केले होते. सूत्रांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण पाच सदस्यीय इंटरपोल समितीच्या न्यायालयात गेले ज्याने आरसीएन (रेड कॉर्नर नोटीस) नाकारली. १३ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याविरुद्ध यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.
https://twitter.com/priyankac19/status/1637810848423976962?s=20
Fugitive Mehul Choksi Interpol Red Corner Notice