विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतात कोट्यवधीचा घोटाळा करुन फरार झालेला भामटा मेहूल चोक्सी भारतात येण्याची चिन्हे आहेत ती केवळ एका मिस्ट्री गर्लमुळे. तिनेच चोक्सीला तिच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या ओढीपोटी चोक्सीने चक्क देश बदलला. आणि आता तो पोलिसांच्या गळ्याला लागला आहे.
भारतातून फरार झालेल्या मेहुल चौकसीच्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे कारण मेहुल चोक्सीच्या प्रकरणात बार्बारा जरबिका नावाची एक महिला आली आहे. काही जण म्हणतात की, बार्बारा जाराबिका ही फरारी मेहुल चोक्सीची मैत्रीण आहे. तर काहींना संशय आहे की, बार्बारा जाराबिका हिनेच मेहुल चोक्सीला हनीट्रॅपमध्ये अडकवले होते, ज्यानंतर तिचे अपहरण झाले.
अँटिगुआचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी बार्बरा जाराबिकाला मेहुल चोक्सीची मैत्रीण म्हटले आहे. तिच्यासोबत मेहुल वेळ घालवण्यासाठी डोमनिका येथे आला होता. मेहुलचे वकील विजय अग्रवाल आणि मेहुलची पत्नी प्रीती यांना असे वाटते की, बार्बारा जाराबिकाचा वापर चोक्सीला दिशाभूल करण्यासाठी आणि डोमनिकातून परत भारतात आणण्यासाठी केला आहे.
एका मुलाखतीत मेहुलच्या पत्नीने सांगितले की, तिच्या नवऱ्याने मॉर्निंग वॉकच्या वेळी बार्बरा जाराबिकाशी मैत्री केली होती. मेहुलने अँटिगुआ मधील जॉली हार्बर जवळील तिच्या अपार्टमेंटमध्ये बार्बराला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले. त्यानंतर येथून ८ ते १० लोकांनी मिळून मेहुल चोक्सीचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण देखील केली. माझ्या पतीच्या अपहरणानंतर ती अचानक गायब झाली. जर तिचा यात सहभाग नव्हता तर अँटिगुआ प्रशासनासमवेत तिने मोकळेपणाने बाहेर यायला हवे होते आणि आपली बाजू मांडली पाहिजे होती.
एकीकडे मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती यांनाही तिचे खरे नाव बार्बारा जाराबिका असल्याचा संशय आहे. तर दुसरीकडे असा मेहूल दावा करतो की, तो बार्बराला कधीच भेटला नाही. सोशल मीडियावर दिसणारी छायाचित्रे ‘बार्बरा जाराबिका’ या नावाने तयार केलेल्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर आहेत. तसेच बार्बराच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये असे दिसून आले आहे की, ती प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट एजंट म्हणून काम करते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतल्याचा उल्लेख तिच्या प्रोफाईलमध्ये आहे. सदर महिला बल्गेरियाची रहिवासी असल्याचेही सांगितले जात आहे.