शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पेट्रोल-डिझेलमधील भेसळ ओळखायची आहे? फक्त हे करा…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 13, 2022 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
petrol diesel1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे जास्त किंमत मोजण्यासोबतच पेट्रोलचा दर्जा तपासणेही तितकेच गरजेचे आहे. कमी दर्जाच्या पेट्रोलमुळे इंजिन खराब होऊ शकते. सोप्या पद्धतीने आपण घरी बसून पेट्रोलची गुणवत्ता तपासू शकता.

कार चालवण्यासाठी पेट्रोलची गरज असते, पण वाहनाच्या चांगल्या आयुष्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. चांगल्या दर्जाचे पेट्रोल वापरल्याने वाहनाचे आयुष्यही सुधारते. वाहनाची कार्यक्षमता आणि मायलेज हे मुख्यत्वे पेट्रोलच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. पंपांवर मिळणा-या पेट्रोल, डिझेलमध्ये भेसळ आहे की नाही हे तपासण्याचा ग्राहकांना हक्कच आहे. शंका आल्यास पंपावर ठेवलेला लिटमस पेपर घेऊन नियमानुसार ग्राहक पेट्रोलची तपासणी करू शकतो. मात्र, या सुविधेची माहितीच नसल्याचे केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

पंपांवर मिळणा-या पेट्रोलमधील भेसळीची अनेक उदाहरणे सतत समोर येत असतात. ग्राहकांनाही या भेसळीची कल्पना असते, पण सरकारी यंत्रणा काही करत नाही, असे बोलून याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्यक्षात नियमानुसार प्रत्येक ग्राहक पेट्रोलपंपावर मिळणा-या पेट्रोलची तपासणी करू शकतो. नव्हे तो त्याचा हक्कच आहे. पेट्रोलियम विभागाच्या नियमांनुसार पंपावर ग्राहकांसाठी लिटमस पेपर, सूचना बोर्ड, शिल्लक साठा, भाव फलक, प्रसाधन गृह, पिण्याचे पाणी, फ्री-एअर चेकिंग या सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. यातील बहुतेक सा-या बाबी पंपांवर असतात. त्याकडे लक्षही जाते. फक्त लिटमस पेपरच्या बाबतीत मात्र साफ दुर्लक्ष होते.

पेट्रोलमधील भेसळ ओळखण्यासाठी प्रत्येक पेट्रोलपंपावर नियमानुसार लिटमस पेपर उपलब्ध असतो. या लिटमस पेपरच्या माध्यमातून पेट्रोलची भेसळ पकडता येते. डेन्सिटीच्या माध्यमातूनही पेट्रोल भेसळ ओळखता येते.याविषयी वाहनधारकांशी संपर्क साधला असता या लिटमस पेपर आणि डेन्सिटीबाबत आणि त्याच्या उपयोगाविषयी अनेक वाहनधारकांना माहिती नसल्याचे दिसून आले. शहरात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या सरकारी कंपन्यांचे पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोलपंपावर रोज लाखो लिटर पेट्रोलचा खप होत असतो.

पेट्रोलपंपांवर कायम गर्दी असते. तेथे असे निदर्शनास आले की, ग्राहक पेट्रोलची शुद्धता तपासत नाहीत. त्यामुळे भेसळ करणा-यांचे फावते. पेट्रोल भेसळ रोखण्याकरिता जिल्हा पुरवठा विभाग पंपांवर तपासणी करतो. जिल्हा पुरवठा विभागाने तीन महिन्यांपूर्वी शहरातील चार पंपांवरील पेट्रोल-डिझेलचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्यापही हाती आलेला नाही.

भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक इंधन आखाती आणि इतर देशांमधून आयात करतो. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने 100 रुपयांचा आकडाही ओलांडला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमागे केंद्र सरकारकडून आयात शुल्क आणि उत्पादन शुल्क, राज्य सरकारांकडून व्हॅट, मालवाहतूक, डीलरचे मार्जिन इत्यादी प्रमुख कारणे आहेत.

खराब पेट्रोलचा वाहनाच्या कार्बोरेटरवर खूप वाईट परिणाम होतो आणि वाहनाचे इंजिन खराब होते. सामान्यतः पेट्रोलची गुणवत्ता तपासण्यासाठी काही साधनांची आवश्यकता असते. परंतु ही उपकरणे घरी व्यवस्थित करणे फार कठीण आहे. त्यामुळे पेट्रोलची गुणवत्ता तपासण्यासाठी तुम्ही फिल्टर पेपर वापरू शकता. फिल्टर पेपर बाजारात सहज उपलब्ध आहे. पेट्रोलची गुणवत्ता तपासण्यासाठी ही पद्धत सर्वात सोपी मानली जाते. पेट्रोल तपासणे गरजेचे आहे.

एका लिटरमागे पेट्रोलचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशावेळी अशुद्ध पेट्रोल गाडीत टाकल्यास इंजिनही खराब होते, शिवाय आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. पेट्रोलचा दर्जा तपासण्यापूर्वी वाहनाचे नोझल स्वच्छ करा. नोझलवर कोणतीही घाण राहू नये. नोझलमधून पेट्रोलचा एक थेंब फिल्टर पेपरवर टाका. काही क्षणातच पेट्रोल सुकते. पेट्रोल फुंकल्यानंतर फिल्टर पेपरवर कोणताही डाग दिसत नसेल तर याचा अर्थ पेट्रोलची गुणवत्ता चांगली आहे. जर फिल्टर पेपरवर कोणतीही घाण किंवा डाग दिसत असेल तर याचा अर्थ पेट्रोलची गुणवत्ता खराब आहे. असे झाल्यास तुम्ही संबंधित पेट्रोल पंपाविरुद्ध ग्राहक संरक्षण विभागाकडे तक्रार करू शकता.

Fuel Petrol Diesel Quality Check Cheating
Filter Paper Engine Safety

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नरेंद्र मोदींच्या ताफ्यात येणार ही अनोखी कार; ठरणार जगातील पहिलेच पंतप्रधान!

Next Post

कशात गुंतवणूक करणे फायदेशीर? स्टेट बँक की पोस्ट ऑफिस? घ्या जाणून…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
Next Post
investment

कशात गुंतवणूक करणे फायदेशीर? स्टेट बँक की पोस्ट ऑफिस? घ्या जाणून...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011