इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आज मुंबईत ” माऊली ” – या भारतातील केवळ केवळ महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्वच्छ स्ट्रीट फूड हबचे उद्घाटन केले. या हबचे औपचारिक उद्घाटन रविवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. एफएसएसएआय च्या ईट राईट इंडिया मोहीमे अंतर्गत सुरू करण्यात आलेला हा ऐतिहासिक उपक्रम अन्न सुरक्षा, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत उद्योजकता यांचा संगम घडवणारा आहे.
हे हब पूर्णपणे बचत गटांमधील (SHGs) महिलांद्वारे चालवले जाते. या महिलांनी ज्यांनी FoSTaC (अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र) प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. स्वच्छता, सुरक्षा आणि व्यवसाय संचलनाचे प्रशिक्षण मिळालेल्या या महिला आता नागरिकांना स्वच्छ सुरक्षित आणि उच्च गुणवत्तेचे स्टेट्स पुरवत आहेत ज्यामुळे खाद्य सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास मजबूत होत आहे.
या हबच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पीयूष गोयल यांनी सांगितले की, “कांदिवली येथे सुरू झालेले केवळ महिलांद्वारे चालवले जाणारे भारतातील पहिले स्वच्छ स्ट्रीट फूड हब, ‘माऊली’चे उद्घाटन, एफएसएसएआयच्या ईट राईट इंडिया चळवळीअंतर्गत एक अभिमानास्पद टप्पा आहे. पूर्णपणे प्रशिक्षित बचत गटातील महिलांद्वारे चालवले जाणारे हे केंद्र महिला सक्षमीकरण, अन्न सुरक्षा आणि सामुदायिक विकासाचे एक उज्ज्वल उदाहरण आहे.”
“माऊली” हब 100% महिला-नेतृत्व असलेला उपक्रम म्हणून वेगळे आहे, जो पूर्णपणे फोस्टॅक स्ट्रीट फूड विक्रेते कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित बचत गट सदस्यांद्वारे चालवला जातो. पश्चिम भारतात 6,000 हून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, ज्यामुळे असंघटित अन्न क्षेत्रातील क्षमता बळकट झाली आहे. या प्रकल्पाने केवळ अन्न सुरक्षा आणि स्वच्छता वाढवली नाही तर देशभरात विस्तारता येईल असे एक अनुकरणीय मॉडेलही तयार झाले आहे.
हा टप्पा पार पाडत, एफएसएसएआयने कार्यक्रमात 200 हून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी सामूहिक प्रशिक्षण सत्र देखील आयोजित केले. पुढील टप्प्यात या प्रशिक्षण उपक्रमाचा विस्तार करुन प्रदेशातील 10,000 हून अधिक विक्रेत्यांना समाविष्ट करण्यासाठी केला जाईल, ज्यामुळे अन्न सुरक्षा पद्धती अधिक मजबूत होतील.
फएसएसएआय मोठ्या शहरांमध्ये अतिरिक्त क्लीन स्ट्रीट फूड हब सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे व्यापक पोहोच आणि परिणाम साधता येईल. ईट राईट इंडिया मोहीम शाळा, कामाच्या ठिकाणी आणि समुदायांमध्ये अधिक खोलवर रुजवली जाईल, ज्यामुळे देशभरात सुरक्षित, निरोगी आणि शाश्वत अन्न पद्धतींची संस्कृती अंतर्भूत होईल.