शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

खात्रीशीर नुकसान भरपाई मिळवून देणारी ‘फळपिक विमा योजना’ आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर…

by Gautam Sancheti
जून 15, 2022 | 3:43 pm
in राज्य
0
grapes farm1 e1742468814608

 

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नैसर्ग‍िक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थ‍ितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेली हवामानावर आधारित फळपिक विमा योजना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा खात्रीचा पर्याय झाला आहे. प्रधानमंत्री पीक वि योजनेंतर्गंत राज्याच्या कृषी विभागाकडून पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते. १५ जून पासून विविध फळपिकांचा मृगबहार सुरू होत आहे. या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेऊन खात्रीशीर नुकसान भरपाई मिळवावी. असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. काय आहे फळपिक विमा योजना जाणून घेऊ !

पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ ह्या उद्देशाने ही योजना राबविली जाते. अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ही योजना राबविण्यात येते. सन २०२०-२१ पासून पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे.

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेतंर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे ३० टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्के पर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून ३५ टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी ५०: ५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. जास्तीत जास्त शेतक-यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे.

अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. संत्रा, मोसंब, डाळिंब व द्राक्ष) केवळ उत्पादनाक्षम फळबागानांच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. यासाठी या योजनेत अधिसूचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय वर्षे ठरविण्यात आले आहे. यात पेरू-३, चिकू-५, संत्रा-३, मोसंबी-३, डाळिंब-२, लिबू-४, द्राक्ष-२, आंबा-५, काजू-५, सिताफळ-३ वय वर्ष उत्पादनक्षम वय ठरविण्यात आले आहे.

मृग बहार २०२२-२३ साठी डाळींब फळासाठी प्रति हेक्टरी ६५०० रूपये हप्त्यात १ लाख ३० हजार रूपये विमा सरंक्षण १५ जूलै ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी आहे. यासाठी १४ जूलै २०२२ पर्यंत विमा रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. मोसंबी फळासाठी प्रति हेक्टरी ४००० रूपये हप्त्यात ८० हजार रूपये विमा सरंक्षण १ जूलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीसाठी आहे. यासाठी ३० जून २०२२ पर्यंत विमा रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख आहे.

चिकू फळासाठी प्रति हेक्टरी ३००० रूपये हप्त्यात ६० हजार रूपये विमा सरंक्षण १ जूलै ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी आहे. यासाठी ३० जून २०२२ पर्यंत विमा रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. सिताफळ फळासाठी प्रति हेक्टरी २७५० रूपये हप्त्यात ५५ हजार रूपये विमा सरंक्षण १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीसाठी आहे. यासाठी ३१ जूलै २०२२ पर्यंत विमा रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. हे विमा संरक्षण देतांना कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त पाऊस, जास्त तापमान, आर्द्रता यानुसार विमा संरक्षण कालावधीची विभागणी करून विमा संरक्षण दिले जाते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृगबहार २०२२-२३ साठी पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच आपल्या गावातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे बरोबरच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा.

महाराष्ट्रासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ५ वा मजला, चिंतामणी अव्हेन्यु. विरानी औद्योगिक वसाहत जवळ, गोरेगाव (इ) मुंबई- ४०००६३ यांच्या माध्यमातून ही योजना राबव‍विली जाते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्राहक सेवा क्रमांक : १८००१०२४०८८, दुरध्वनी क्र. ०२२ – ६८६२३००५, ई-मेल- [email protected] संपर्क साधावा. असे आवाहन अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचेकडून करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पूर्ववैमनस्यातून घरी आलेल्या पुतण्यास घरमालक व त्याच्या साथीदारांनी केली बेदम मारहाण

Next Post

ओबीसी आरक्षण प्रकरणी समता परिषदेचे येवल्यात निर्दशने ( बघा व्हिडीओ )

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
20220615 153545

ओबीसी आरक्षण प्रकरणी समता परिषदेचे येवल्यात निर्दशने ( बघा व्हिडीओ )

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011