इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दोस्तीसाठी जीव देऊन टाकू… असे म्हणणे सोपे असते. पण, प्रत्यक्ष जीव देणारे फार थोडके असतात. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील घटनेने अशाच एका आगळ्यावेगळी मैत्री पुढे आली असून एका मित्राने चक्क दुसऱ्या मित्राच्या चितेवर उडी घेतली. मुख्य म्हणजे यामध्ये उडी घेणाऱ्या मित्राचाही मृत्यू झाला.
पोलिस स्टेशन नागला खंगार परिसरातील स्वरूप पाट या भागात राहणाऱ्या अशोक आणि आनंद या दोन मित्रांसंदर्भात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. हे दोघेही ३० वर्षांपासूनचे मित्र. सोबतच प्राथमिक शिक्षण झाले. अशोक गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होता. महिनाभरापूर्वी डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचे सांगितले. अशोकने शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. यानंतर यमुनेच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिता पेटवून सर्वजण घरी परतायला लागले. पण, आनंद तिथेच बसून रडत राहिला. त्यानंतर अचानक त्याने जळत्या चितेत उडी घेतली. चितेला लागलेल्या भीषण आगीमुळे आनंद ९० टक्के भाजला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक सांगताना एसपी रणविजय सिंह म्हणाले,‘आनंदला त्याच्या मित्राचा मृत्यू सहन झाला नाही आणि त्याने जळत्या चितेत उडी घेतली. अशोकचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आणि परतायला सुरुवात केली. तेव्हाच आनंदने जळत्या चितेत प्रवेश केला. गंभीररित्या जळालेल्या गौरवला प्रथम फिरोजाबाद आणि नंतर आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.
Friend Death Cremation Man Jump