पणजी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोव्यात मुक्कामी आलेल्या फ्रेंच अभिनेत्रीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्ला ११ दिवस पोलिसांनी ओलीस ठेवल्याचा दावा तिने केला आहे. तिच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. तब्बल ११ दिवसांच्या कठोर पहाऱ्यानंतर गुरुवारी रात्री तिची सुटका करण्यात आली.
मारियान बोर्गो या ७५ वर्षी फ्रेंच अभिनेत्री गोव्यातील कलंगुट बीच परिसरात घर घेतले. येथे वास्तव्यादम्यान आलेल्या अनुभवावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनातून त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करतानाच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील पर्यटनाला चालना देणारे एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा जगभर प्रयत्न करत आहेत. परंतु अलीकडील घटनांमुळे माझी पूर्ण निराशा झाली आहे. गोव्यात राज्य पातळीवर या प्रयत्नांना यश मिळू शकले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय?
पोलिसांच्या दाव्यानुसार, बोर्गो यांनी कलंगुट बीच परिसरात घर घेतले आहे. ज्या मालमत्तेचा वाद सुरु आहे, त्यात मालक असल्याचा दावा करणारे दोन पक्ष आहेत. एक फ्रेंच अभिनेत्री बोर्गो आणि दुसरी महिला नेपाळची रहिवासी आहे. हे प्रकरण दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची तक्रार बोर्गो यांनी पोलिसांकडे केली होती. पण, पोलिसांनी त्यांच्यावरच कठोर पाळत ठेवली होती, असा अभिनेत्रीचा आरोप आहे. गोवा पोलिसांनी मात्र त्यांचे दावे खोडून काढले आहेत. हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याने आणि न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे. तसेच सारेच कोणत्याही बंधनाशिवाय वावरत होते. यामुळे अभिनेत्रीने पोलिसांवर ओलिस ठेवल्याच्या आरोपांची पुष्टी करता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कोण आहे मारियान बोर्गो?
मारियान बोर्गो ही संपूर्ण युरोप आणि भारतातील चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटरमधील तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. केट हडसन, ग्लेन क्लोज आणि स्टीफन फ्राय यांच्यासह द बॉर्न आयडेंटिटी, अ लिटल प्रिन्सेस आणि फ्रँको-अमेरिकन रोम-कॉम “ले डिव्होर्स” यामध्ये ती झळकली आहे. तिने अलीकडेच “डॅनी गोज ऑम” या भारतीय कलाकृतीसाठीही काम केले होते. तिने २००८ मध्ये फ्रान्सिस्को सौसा नावाच्या वकिलाकडून हे घर विकत घेतले होते. परंतु साथीच्या आजाराच्या वेळी सौझाचा मृत्यू झाला. हे घर सेवानिवृत्तीसाठी नंतर आराम करण्यासाठी घेतले होते पण यातून मनस्तापच अधिक होत असल्याचे तिने सांगितले.
French Actress Allegation on Goa Police