गोदा कश्यपी फार्मर प्रॉड्यूसर कंपनीचा पुढाकार
गिरणारे – गोदा कश्यपी फार्मर प्रॉड्यूसर कंपनीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष नितीन गायकर यांनी लॉकडॉऊनच्या काळात नागरिक घराबाहेर पडत नसल्याने त्यांना दररोजच्या भाजीपालासाठी चिंता सतावत होती. नेमकी हीच बाब हेरून त्यांच्याच गोदा कश्यपी फार्मर प्रॉड्यूसर कंपनीच्या माध्यमातून दररोज ८०० कुटुंबांना ताजा भाजीपाला वाटण्याचा निर्णय घेतला.
नाशिक तालुक्याच्या पश्चिम पट्यातील प्रमुख गावांपैकी एक असलेल्या गिरणारे येथील जवळपास १ हजार उंबरे आहे. आजूबाजूच्या खेड्यापाड्यांसाठी ही प्रमुख बाजारपेठ आहे. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे आव्हान असतांना नागरिकांनी सतावणारी दररोजची भाजीपाल्याची चिंता – भाजीपाला विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना सतावणारी चिंता या दोन्हीचे निराकारण करण्यासाठी संस्थेचे चेअरमन असलेल्या नितीन गायकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन हा प्रश्न सोडवत सुमारे दोन दिवसाला ५० हजार रु. किमतीचा शेतमाल ज्यात टोमॅटो, गिलका, शिमला मिरची, भेंडी,फ्लॉवर,गाजर विकत घेत त्याचे घरोघरी मोफत वाटप करण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार या कंपनीचे सीईओ सुभाष शिंदे, अरुण घुले, प्रवीण कोरडे, ज्ञानेश उगले, दादा गायकर, संदीप थेटे, स्वप्निल थेटे, अमोल मोरे, नितिन थेटे, रंगनाथ दिवे, भास्कर दिवे, कृष्णा ठेपणे आदींच्या सहकार्याने दररोज हा ताजा शेतमाल पाकिटे तयार करून घरोघर पोहचविला जात आहे.
लॉकडाऊन असे पर्यत हा उपक्रम
लॉकडाऊन असे पर्यत हा उपक्रम आम्ही सुरु ठेवणार आहे.त्यामुळे शेतकरी असो व गिरणारे येथील नागरिकांनी केवळ शासकीय नियमांचे पालन करावे जी मदत लागेल ती सर्वतोपरी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
नितीन गायकर, चेअरमन, गोदा कश्यपी फार्मर प्रॉड्यूसर कंपनी.