नाशिक – आर्ट ऑफ लिव्हिंग आणि राम जानकी सेवा संघ ट्रस्ट यांच्यावतीने कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांसाठी मोफत जेवण सेवा सुरू केली आहे. ही सेवा अशी,
‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ या उक्तीला अनुसरून कोरोना च्या ह्या भयावह परिस्थितीत जिथे एक पॉझिटिव्ह व्यक्तीला आपल्या घरातील सदस्याला भेटणे सुद्धा कठीण झाले आहे. तिथे सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे जेवणाचा. तर आता जेवणाची काळजी करू नका. अगदी घरगुती चव असलेला डब्बा तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या दारापर्यंत आम्ही पोचवत आहोत.
ही सेवा आम्ही विनामूल्य देत असून जेवण आपणांस भावे केटरिंग यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ज्या लोकांना दोन वेळचं जेवण विकत घेणं अशक्य आहे किंवा ज्यांचे नातेवाईक किंवा घरातील व्यक्ती आपल्यापेशंट असलेल्याआपल्या नातेवाईकाला जेवण पोचवू शकत नाही त्यांनी या सेवेचा जरूर लाभ घ्यावा. ज्यांना कोणाला ही सेवा हवी असल्यास त्यांनी सकाळी ९ च्या आत आणि सायंकाळी ४ च्या आत कळवावे, ही विनंती
नोंद – हा आमचा मुख्य व्यवसाय नसून, समाजाप्रती ह्या कठीण प्रसंगात मनापासून केलेलं एक सेवा आहे
नाशिक मधील खालील भागात ही सेवा पोचविली जाणार आहे
१. इंदिरा नगर
२. गोविंद नगर
३. अश्विन नगर
४. पाथर्डी फाटा
५. कर्मयोगी नगर
६. महात्मा नगर
७. त्रिमूर्ती चौक
८. शरणपूर रोड
९. कॉलेज रोड
१०. गंगापूर रोड
११. सिरीन
१२. रामवाडी
१३. भाभा नगर
१४. काठे गल्ली
वरील सेवेचा लाभ घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा
चिराग पाटील
9922136378, 9022152858
आर्ट ऑफ लिव्हिंग आणि राम जानकी सेवा संघ ट्रस्ट, नाशिक.