विशेष प्रतिनिधी, पुणे
प्रत्येकाच्या हातात अत्याधुनिक मोबाईल असल्याने त्यातील व्हाट्सअपसह अनेक समाज माध्यमावर वेगळ्या पोस्ट आणि संदेश येत असतात. त्यातील बहुतांश संदेश हे बोगस आणि भामटेगिरी करणारे असतात. अशा खोटया संदेश जाळ्यात लोकांना ओढण्यासाठी काही भामटे प्रयत्न करतात परंतु अशा गैरप्रकाराला बळी पडू नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. सध्या असाच एक मॅसेज व्हाट्सअपवर फिरत असून त्यात टाटा सफारी एसयूव्ही जिंकण्याचा संधी असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु वास्तवात हा संदेश बनावट असून चिनी हॅकर्सकर्त्याकडून ही भामटेगिरी करण्यात आल्याचे दिसून येते.
व्हॉट्सअॅपवर एक संदेश पाठविलेला त्यात टाटा सफारी एसयूव्ही कार जिंकण्याची संधी दिली जात आहे. तसेच ही सेलिब्रेशनची ऑफर असून ज्याअंतर्गत कंपनी टाटा मोटर्स ब्रँडच्या ३० दशलक्ष कारच्या विक्रीवर टाटा सफारी कार जिंकण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहे. असे म्हटले असून या संदेशाबरोबरच कंपनीकडून अभिनंदन संदेशही पाठविला जात आहे. या प्रकारच्या व्हायरल मेसेजचे सत्य काय आहे ते जाणून घेऊ या…
चीनी हॅकर्सची बनावट वेबसाइट
भारतीय सायबर-सुरक्षा संशोधकाच्या मते, विनामूल्य टाटा सफारी कार देण्याची सेलिब्रेशन ऑफर हा चीनमधील हॅकर्स चालवणाऱ्या लोकांचा ऑनलाइन फसवणूकीचा प्रकार आहे. या प्रकारच्या सेलिब्रेशन ऑफरमध्ये भाग घेण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल. परंतु असे करणे धोकादायक ठरू शकते, कारण असे संदेश आपल्या डेटा चोरीसाठी असल्याचे दिसून येतात. यामध्ये आपला ब्राउझिंग इतिहास, सिस्टम माहिती तसेच वापरकर्त्याचा कुकी डेटा चोरीला जाऊ शकतो.
डिव्हाइसला नुकसान
मोबाईल वापरकर्त्याने आपल्या स्मार्टफोनमध्ये जर अशी लिंक उघडली, ज्यामध्ये व्हॉट्सअॅप येत आहे, तर हे आपल्या डिव्हाइसला देखील हानी पोहोचवू शकते. अशा प्रकारे लिंकमध्ये टाटा मोटर्सची बनावट वेबसाइट वापरली गेली आहे. या फोल्डरच्या (पृष्ठाच्या) शेवटी एक फेसबुक कमेंट विभाग आहे, तेथे बरेच संदेश आहेत, जेथे अनेक मोबाईल वापरकर्त्यांनी टाटा सफारी कार जिंकल्याचे सांगितले आहे, परंतु हा सर्व बनावट प्रकार आहे.