विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोच्या संकटकाळात लॉकडाऊननंतर बिहारमध्ये सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाइन अफरातफरीचे प्रकार वाढले असून बँकेमधून परस्पर रक्कम करण्याचा गैरप्रकार होत आहेत. बिहारमधील उन्नाव येथील भाजप खासदार साक्षी महाराज यांच्या बँक खात्यामधून ९७ हजार ५०० रुपये लंपास केल्याप्रकरणी पोलिसांनी बिहारमधील दोन आरोपींना अटक केली आहे.
खासदार साक्षी महाराज यांनी एप्रिलमध्ये नवी दिल्लीच्या संसद पथ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितले होते की, कोणीतरी बनावट चेकद्वारे त्यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून ९७ हजार ५०० रुपये काढून घेतले आहेत. वास्तविक ज्या बनावट चेक नंबरमधून पैसे काढले गेले, त्याचे खरे चेक त्यांच्याकडेच आहेत.
त्यानंतर या प्रकरणी पोलिस पथकाने तपास सुरू केला. एसबीआय बँकेकडून हा तपशील काढला असता, निहाल सिन्हा आणि दिनेश राय या दोन आरोपींनी खासदाराच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी तीन बनावट धनादेश वापरल्या आढळले.
चौकशीनंतर आरोपी निहाल याला पाटणा येथून अटक करण्यात आली असून त्याला रिमांडवर तुरूंगात पाठविले आहे, तर दिनेश याची चौकशी केली जात आहे. त्या दोघांनी सुमारे १ हजारहून अधिक लोकांच्या बँक खात्यातून त्यांनी कोट्यावधी रुपये काढून घेतल्याचे आरोपींनी उघड झाले आहे.
आरोपी दिनेश राय हा बी.एस्सी पदवी धारक असून तो निहाल याला बनावट धनादेश देत असे. त्यानंतर तो सदर धनादेश वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करून पैसे काढत असे. या कामासाठी त्यांना ३० टक्के कमिशन मिळायचे. दिनेश राय हा बनावट धनादेश छापून घेत असे.
सदर आरोपी बँकांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी बनावट रक्कमेचे धनादेश जमा करत असत, कारण बँक संबंधित ग्राहकांना ५० हजार आणि त्याहून अधिक चेकची माहिती देते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात बँक कर्मचाऱ्यांचा देखील या प्रकरणात हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.