पॅरिस – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर एका आंदोलकाने अंडे फेकल्याची घटना घडली आहे. मॅक्रॉन हे लियॉन दौऱ्यावर होते. त्यावेळी हा प्रकार घडला. अंडे फेकणाऱ्या आंदोलकाला सुरक्षा रक्षकांनी तातडीने ताब्यात घेतले. हा आंदोलक लाँग लिव्ह रिव्होल्यूशन असा नारा देत होता. त्याचवेळी त्याने राष्ट्राध्यक्षांवर अंडे भिरकावले. हा सारा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून कुठलीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. गेल्या जून महिन्यात एका व्यक्तीने राष्ट्राध्यक्षांच्या कानशिलात लगावली होती. त्याला चार महिने कारावासाची शिक्षा झाली होती. आता या आंदोलकाला काय शिक्षा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बघा व्हिडिओ
https://twitter.com/Reuters/status/1442502712470302720?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442502712470302720%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Finternational%2Fstory-french-president-emmanuel-macron-hit-with-egg-by-protester-in-lyon-4680848.html