नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फोर पॉइंट्स बाय शेरेटन या मॅरियट बोनवॉयच्या ३० पेक्षा जास्त असामान्य हॉटेलच्या जागतिक पोर्टफोलिओचा भाग असलेल्या ब्रँडने ‘फोर पॉइंट्स बाय शेरेटन नाशिक’ ची घोषणा केली. यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या गतिमान शहर असलेल्या नाशिकमध्ये फोर पॉइंट्स बाय शेरेटन या ब्रँडचे पदार्पण होत आहे. नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३० मिनिटांच्या अंतरावर, मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे हॉटेल या ब्रँडच्या इतर सर्व लोकप्रिय गोष्टी उपलब्ध करून देते.
या महत्त्वाच्या घडामोडी बाबत भाष्य करताना मॅरियट इंटरनॅशनलचे दक्षिण आशिया एरिया व्हाईस प्रेसिडेंट रंजू ॲलेक्स म्हणाले, “संपूर्ण भारतभर आमच्या उपस्थितीचा विस्तार करण्याच्या सखोल कटीबध्दतेसह नाशिकमध्ये फोर पॉइंट्स बाय शेरेटनने पाऊल ठेवले आहे. भारतातील वाढत्या टियर-टू आणि टियर-थ्री मार्केटमध्ये आधुनिक काळातील आदरातिथ्य उपलब्ध करून देण्याच्या आमच्या धोरणाशी ते सुसंगत आहे. प्रामाणिक, सुलभ आणि आरामदायी अनुभव देण्याच्या ब्रँडच्या मूलभूत तत्त्वांसह त्याची रचना करण्यात आली आहे. आम्ही या नावाजलेल्या आणि ऐतिहासिक स्थानाचा आत्मा आणि ऊर्जा प्रतिबिंबित करणाऱ्या आरामशीर आणि संस्मरणीय मुक्कामासाठी पाहुण्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत.”
आजच्या स्वतंत्र प्रवाशांसाठी सोय करण्याच्या ब्रँडच्या वचनाला अनुसरून फोर पॉइंट्स बाय शेरेटन नाशिकमध्ये १२५ समकालीन खोल्या आहेत. ब्रँडची धोरणे लक्षात घेऊन त्यांचे रचना करण्यात आली असून त्यात आधुनिकता आणि व्यावहारिकता यांचे प्रतिबिंब पडले आहे. हॉटेलच्या प्रत्येक गेस्ट रूममध्ये ५२-इंच टीव्ही, मोफत वाय-फाय आणि प्रशस्त वर्कस्टेशन्स आहेत. जेवणासाठी स्मार्ट आणि विविध पर्याय उपलब्ध आहेत. यात ब्रँडच्या प्रमुख सर्वश्रेष्ठ ब्रूज़ कार्यक्रमाचा भाग म्हणून आरामशीर वातावरणात कॉकटेल आणि वाईनसोबत स्थानिक तयार केलेली बिअर उपलब्ध असलेला इंटरमेझो हा लाउंज बार; शहराच्या विहंगम दृश्यांसह दिवसभर जेवण आणि स्थानिक चवीचा मेनू देणारा आर्बर किचन आणि सर्वात नवीन नाईटलाइफ डेस्टिनेशन म्हणून ओळखला जाणारा हाय नोट, जेथे क्युरेटेड डीजे परफॉर्मन्स होस्ट कऱण्यात येतो, जोडीला धडकते वातावरण आणि स्वादिष्ट फिंगर फूड.
सर्व प्रकारच्या बैठकांसाठी आणि कार्यक्रमांसाठी ८,३०० चौरस फुट जागेसह हे हॉटेल कॉर्पोरेट मेळावे, विवाहसोहळे आणि सामाजिक उत्सवांसाठी एक प्रमुख ठिकाण बनण्यासाठी तयार आहे. येथे प्रत्येक प्रसंगासाठी अविस्मरणीय अनुभव मिळेल. अतिथींना इन्फिनिटी पूलमध्ये अंग मोकळे करण्याचा किंवा अत्याधुनिक फिटनेस सेंटरमध्ये जाऊन त्यांच्या फिटनेस दिनचर्या कायम ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ते नवीनतम आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून २४/७ उघडे आहेत.
आरामदायी निवासस्थानाच्या माध्यमातून प्रवाशांना नाशिकची समृद्ध संस्कृती आणि निसर्गरम्य सौंदर्य पाहण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. या हॉटेलचे व्यावहारिक डिझाईन पाहता, व्यावसायिक प्रवासी आणि पर्यटक या दोन्हींच्या गरजांची पूर्तता करण्याचे आमचे ध्येय आहे,” असे फोर पॉइंट्स बाय शेरेटन नाशिकचे जनरल मॅनेजर श्रेयस अरनोली म्हणाले.