नवी दिल्ली –भारतातील आणखी चार पाणथळ ठिकाणांना, रामसर ठिकाणे म्हणून रामसर कार्यालयाने मान्यता दिली आहे. गुजरातमधील थोल आणि वाधवाना तर हरियाणातील सुल्तानपूर आणि भिंडवास इथली ही स्थळे आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्वीटर संदेशाद्वारे याची माहिती देत आनंद व्यक्त केला. पर्यावरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष आस्था आहे, त्यामुळे भारतात पाणथळ जागांच्या संवर्धनासंदर्भात एकूणच सुधारणा झाल्याचे ते म्हणाले.
यासह, भारतात रामसर स्थळांची संख्या ४६ झाली आहे आणि या स्थळांद्वारे व्याप्त क्षेत्रफळ आता १,०८३,३२२ हेक्टर आहे . हरियाणात पहिल्या रामसर स्थळांची नोंद झाली आहे, तर गुजरामधे २०१२ मध्ये घोषित झालेल्या नलसरोवरनंतर आणखी तीन जागांचा समावेश झाला आहे. “जागतिक जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत मानवी जीवनासाठी महत्वाच्या असलेल्या पाणथळ जागांचे आंतरराष्ट्रीय जाळे विकसित करणे तसेच त्याची निगा राखणे हा रामसर यादीचा उद्देश आहे. यामाध्यमातून संबंधित घटक, प्रक्रीया आणि त्याचे लाभ यांची काळजी घेतली जाते.
जागांमुळे अन्न, पाणी, तंतुमय पदार्थ, भूजल पुनर्भरण, जलशुद्धीकरण, पूर नियंत्रण, धूप नियंत्रण आणि हवामान नियमन यासारख्या महत्त्वपूर्ण संसाधने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक सेवांचे लाभ मिळतात. खरं तर, ते पाण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. आपल्याला ताज्या स्वच्छ पाण्याचा मुख्य पुरवठा जागेतून होतो. पावसाचे पाणी ती शोषून घेते आणि भूजल पुनर्भरणाला मदत करते.
भिंडवास वन्यजीव अभयारण्य, ही हरियाणातील सर्वात मोठी मानवनिर्मित गोड्या पाण्याची पाणथळ जागा आहे. २५० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती वर्षभर अभयारण्यात विश्रांती आणि भटकंती करतात. लुप्तप्राय होत असलेल्या इजिप्शियन गिधाड, स्टेप्पी गरुड, पल्लास फिश गरुड आणि ब्लॅक-बेलीड टर्नसह जागतिक स्तरावर दुर्मिळ असलेल्या दहापेक्षा जास्त प्रजाती इथे आढळतात.
हरियाणातील सुलतानपूर राष्ट्रीय उद्यानात २२० पेक्षा अधिक जलचर, पक्षी यांच्या दुर्मिळ प्रजातींना संरक्षण मिळत आहे. यात रहिवासी, हिवाळी स्थलांतरित आणि स्थानिक स्थलांतरित जलचर तसेच पक्ष्यांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर नष्ट होण्याचा गंभीर धोका असलेल्या प्रजातींचा ही यात समावेश आहे. प्रामुख्याने पटकन मिळमिसळून जाणाऱ्या लॅपविंग, आणि लुप्तप्राय इजिप्शियन गिधाड, सकर फाल्कन, पॅलास फिश ईगल आणि ब्लॅक-बेलीड टर्न यांचा समावेश आहे.
गुजरातमधील थोल तलाव वन्यजीव अभयारण्य, पक्षांसाठी मध्य आशियाई उड्डाण मार्गावर आहे. इथे ३२० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. इथल्या पाणथळ परिसरात ३० पेक्षा जास्त धोक्यात असलेल्या जलचर पक्षांच्या प्रजाती आढळतात. यात व्हाईट-रम्प्ड गिधाड, लॅपविंग, आणि असुरक्षित सारस क्रेन, कॉमन पोचार्ड आणि लेसर व्हाईट-फ्रंटेड हंस अशा दुर्मिळ प्रजाती आहेत.
गुजरातमधील वाधवाना पाणथळ ठिकाण पक्षीजीवनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्त्वाचे ठिकाण आहे. इथे हिवाळ्यात स्थलांतरित जलपक्षी आश्रयाला येतात. यामधे मध्य आशीयाई उड्डाण मार्गावरुन स्थलांतरित होणाऱ्या ८० पेक्षा जास्त प्रजातींचा समावेश आहे. त्यात पल्लास फिश-ईगल, असुरक्षित कॉमन पोचर्ड, डाल्मेटियन पेलिकन, ग्रे-हेडेड फिश-ईगल आणि फेरुगिनस डक अशा नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींचा समावेश आहे. या पाणथळ जागांचा योग्य उपयोग व्हावा याची खातरजमा करण्यासाठी राज्य पापणथळ प्राधीकरणांबरोबर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय मिळून काम करत आहे.
https://twitter.com/byadavbjp/status/1426232561341108225?s=20