लखनऊ : देशभरात कोरोनाच्या विळखा वाढत असताना महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेशातही कोरोनाचा फैलाव कमी होताना दिसत नाही. या उलट ते वाढतच असून उत्तर प्रदेशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. दुर्देवाची गोष्ट म्हणजे या राज्यात आतापर्यंत भाजपच्या चार आमदारांचा कोरोनाने निधन झाले आहे.
कोरोनामुळे या राज्यात आता पर्यंत चार आमदारांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर आतापर्यंत भाजपच्या चार आमदारांचं निधन झाले आहे. यात आमदार केशर सिंह गंगवार , औरेया येथील भाजप आमदार रमेश दिवाकर, लखनऊचे आमदार सुरेश श्रीवास्तव आणि माजी मंत्री व भाजपचे विद्यमान आमदार दाल बहादूर कोरी यांचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात भारतात ४ लाख १४ हजार १८८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एका दिवसात नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सुमारे दोन हजारांनी वाढ झाली आहे. तसेच ३ हजार ९१५ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. यापुर्वी एकाच दिवशी भारतात सर्वाधिक ३ हजार ९८० कोरोनाबळींची नोंद झाली होती.