इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड मधील अभिनेत्रींनी एखाद्या श्रीमंत व्यक्तीबरोबर लग्न करणे किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे ही काही नवीन गोष्ट राहिली नाही, यापूर्वी अनेक अभिनेत्री असे पराक्रम केले आहेत. परंतु सध्या एका अभिनेत्रीची यासंदर्भात खूपच चर्चा सुरू आहे. ती अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन होय. तिचे कोटयावधीचे कर्ज बुडून देशातून फरार झालेल्या तथाकथीत उद्योजक ललित मोदी बरोबर अफेअर सुरू असल्याने जोरदार चर्चा सुरू आहे.
साहजिकच पुन्हा एकदा ललित मोदी प्रसिध्दीच्या झोतात आला असून त्याची संपत्ती किती आहे ? याची देखील चर्चा सुरू झाली आहे. ललीत मोदीच्या अनैतिक नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेक जण त्यांना ट्रोल करत आहेत. सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या वयातील अंतराबाबत ट्रोलिंग होत असून ललित मोदी 12 वर्षांपूर्वी देश सोडून पळून गेल्याचेही एक कारण आहे.
तो एक मोठा उद्योगपती आहे, त्याला सध्या भारतात फरारी घोषित करण्यात आले आहे. ललित मोदींवर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. ललित मोदी सध्या ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये विलासी जीवन जगत आहेत. एका रिपोर्ट्सनुसार, ललित मोदी आपल्या बिझनेसमधून वर्षाला करोडो रुपये कमवत आहेत. त्यांची एकूण संपत्ती 12 हजार कोटींच्या आसपास असून त्याच्याकडे सुमारे 4500 कोटींची रोख संपत्ती आहे.
ललित मोदींनी भारताच्या क्रीडा जगतात पहिल्यांदाच क्रिकेट आयपीएल लीग सुरू करणारे ललित मोदी करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. भारतातील हा मोठा उद्योगपती परदेशात पलायन करूनही विलासी जीवन जगत असून वर्षाला करोडोंची कमाई करत आहे. ललित मोदीची लक्झरी जीवनशैली, कमाई, घर, वाहने आणि एकूण संपत्ती प्रचंड आहे.
ललित मोदी हे दिल्लीतील एका मोठ्या व्यावसायिक वर्गातील कुटुंबातील आहेत. दि. 29 नोव्हेंबर 1963 रोजी जन्मलेल्या ललित मोदीचे वडील कृष्ण कुमार मोदी आणि आजोबा गुजरमल मोदी हे मोठे उद्योगपती आहेत, त्यांनी कारकिर्दीची सुरुवात साखर कारखान्यातून केली होती. ललित मोदींच्या आजोबांनी उत्तर प्रदेशातील मेरठ शहराजवळ मोदीनगर हे औद्योगिक शहर वसवले होते.
त्या काळात मोदी एंटरप्रायझेस हा एक मोठा व्यवसाय म्हणून प्रसिद्ध झाला. ललित मोदींच्या कुटुंबाचे दीर्घकाळ चाललेले व्यवसाय साम्राज्य असून त्यात मद्य, सिगारेट आणि पान मसाला यांचे सुप्रसिद्ध ब्रँड आणि किरकोळ दुकाने, रेस्टॉरंट चेन आणि ट्रॅव्हल कंपन्या यांचा समावेश आहे.
दिल्लीत जन्मलेला ललित मोदी 2010 मध्ये भारत सोडून परदेशात पळून गेला होता. लंडनमध्ये त्यांचे एक आलिशान महालासारखे घर आहे. लंडनमधील त्यांचा बंगला 7000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. ललितच्या बंगल्यात 8 बेडरूम आहेत. या बंगल्याच्या देखभालीसाठी ललित मोदी महिन्याला २० लाख रुपये देतो.
ललित मोदी याच्याकडे तीन फेरारी कार आहेत. ज्यांची किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. उद्योगपती ललित मोदी याचे मोठे व्यावसायिक साम्राज्य आहे. मोदी हा एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीचे अध्यक्ष आहेत. ललित मोदींची कंपनी मनोरंजन, फूड चेन, तंबाखू, पान मसाला, माउथ फ्रेशनर, रिटेल, शिक्षण आणि कॉस्मेटिकसह व्यवसायात गुंतलेली आहे. भारताव्यतिरिक्त पश्चिम आफ्रिका, दक्षिण-पूर्व आफ्रिका, युरोप, दक्षिण-पूर्व आशिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये तो व्यवसाय करतो. व्यवसायातून त्याची कोट्यवधींची कमाई आहे.
Founder IPL President Lalit Modi Wealth