नाशिक – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील अभेद्य गड कोटांची माहिती सर्वांना होणे आवश्यक आहे. तसेच, महाराष्ट्र राज्याला असलेला गड-किल्यांचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन पर्यटन संचलनालय, महाराष्ट्र शासन व कोकण पर्यटन विकास संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी लहान मुलांसाठी किल्ले बनवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्या मुला-मुलींच्या गटास ५x५ फुट जागा देण्यात येईल. या ठिकाणी मुलांनी दगड-माती-विटा यांचा वापर करून किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारायची आहे. यातील विजेत्या गटास प्रथम पारितोषिक रु. ५०००/-, व्दितीय पारीतोषिक रु.३०००/- व तृतीय पारीतोषिक रु. २०००/- त्वरित अदा करण्यात येईल. तसेच सदर किल्ले पुढील सात दिवस नाशिककरांना बघण्यासाठी खुले असतील.
स्पर्धेचे नियम असे
१) आपले नाव व पुर्ण पत्ता कळवा.
२) किल्ला हा आपणास शनिवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दु.३ या वेळेत बनवायचा आहे.
३) ठिकाण :- चिंतामणी काॅलनी ग्राऊंड , राजीवनगर.
४) आपल्या टिममधे जास्तीत जास्त ५ सदस्य असतील.
५) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
६) किल्ला बनवण्यासाठी लागणारे सर्व साहीत्य उदा.माती ,वीटा,वाळू इ. आपणांस आणावयाचे आहे आयोजकांतर्फे पाणी पुरवण्यात येईल.
७) बक्षीस दि. ६ नोव्हेंबर रोजी त्याच ठिकाणी रोख स्वरुपात अदा केले जाईल.
तरी इच्छुकांनी कोकण पर्यटन नाशिक यांच्या ०२५३-२३१३३६८ किंवा ९६८९०३८८८०
या दुरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.