मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील गड व किल्ले यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आणि विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्ष तर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव, संजय केळकर, पांडुरंग बलकवडे, प्र.के. घाणेकर, ऋषिकेश यादव, डॉ. पुष्कर सोहोनी, डॉ. सचिन जोशी, अतुल गुरु, गिरीश टकले, संकेत कुलकर्णी, मुकुंद गोरक्षकर या समितीत सदस्य असतील. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील.
विभागीय समितीमध्ये कोकण विभागासाठी डॉ. जी.एस. महाडिक, मृदुला माने, प्रवीण कदम, प्रवीण भोसले सदस्य असतील. पुणे विभागासाठी उमेश झिरपे, पंडित अतिवाडकर, संतोष हसुरकर, श्रमिक गोजमगुंडे, भगवान चिले हे सदस्य असतील. नागपूर विभागासाठी बंडु धोत्रे, राहुल नलावडे, अशोक सिंघ ठाकूर, अशोक टेमझरे हे सदस्य असतील. नाशिक विभागासाठी महेश तेंडुलकर, प्रशांत परदेशी, अंकुर काळे, राजेंद्र टिपरे हे सदस्य असतील. औरंगाबाद व नांदेड विभागासाठी राजेश नेलगे, डॉ. प्रमोद बोराडे, सतिश अक्कलकोट, तेजस्विनी जगदिश आफळे, शैलेश वरखडे हे सदस्य असतील.
Fort Conservation Committee Reformation