पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे दुबई येथे निधन झाले आहे. परवेज मुशर्रफ यांनी ऑक्टोबर १९९९ मध्ये लष्करी बंड करून पाकिस्तानची सत्ता काबीज केली होती. मुशर्रफ २००१ ते २००८ पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्य होते. मुशर्रफ मार्च २०१६ पासून दुबईत राहत होते. बऱ्याच काळापासून त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांचे निधन झाले.
पाकिस्तानमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर परवेज मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि राज्यघटना निलंबित केल्याचा आरोप होता. ३१ मार्च २०१४ रोजी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. पेशावर उच्च विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाने ही फाशीची शिक्षा रद्द केली होती.