मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मद्यप्राशन करून पत्नीला मारहाण करणे माजी क्रिकेटपटू विनोद कंबळी यांना चांगलेच महागात पडणार आहे. त्यांची पत्नी अँड्रिया यांनी विनोद कांबळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दारूच्या नशेत आपल्याला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचा आरोप पत्नीने कांबळी यांच्यावर केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विनोद कांबळी अडचणीत येण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही तर ते वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. आता पत्नीनेत तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार, विनोद कांबळी यांनी कुकिंग पॅन (स्वयंपाकासाठीचे एक भांडे) फेकून मारल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. या घटनेत अँड्रिया यांच्या डोक्याला जखम झाली आहे.
दारुच्या नशेत कांबळी यांनी हे कृत्य केल्याचा दावा केला जातोय. मद्यप्राशन करून त्यांच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कांबळी यांच्याविरोधात भारतीय दंडविधानातील ३२४, ५०४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नंतर मात्र हे प्रकरण मिटल्याचे सांगत कांबळी यांच्या पत्नीने सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला आहे.
मुलासमोर केली मारहाण
पत्नीला मारहाण करताना घटनास्थळी कांबळी यांचा १२ वर्षीय मुलगा उपस्थित होता. त्याने वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रागाच्या भरात कांबळी यांनी त्यांच्या पत्नीच्या अंगावर कुकिंग पॅन फेकून मारला. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर विनोद कांबळी यांच्या पत्नीवर उपचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
शिखर धवनला दिलासा
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनला दिल्ली न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांची विभक्त पत्नी आयेशा मुखर्जीला सोशल मीडिया, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मित्र, नातेवाईकांसह इतर व्यक्तींमध्ये बदनामीकारक, बदनामीकारक आणि निराधार सामग्री प्रसारित करण्यापासून रोखले. यासोबतच न्यायालयाने धवनला दररोज अर्धा तास व्हिडिओ कॉलवर मुलाशी बोलण्याची परवानगी दिली आहे. क्रिकेटर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी सध्या ऑगस्ट २०२० पासून वेगळे राहत आहेत.