विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून पत्र लिहले असून हे पत्र राजकीय पटलावर चांगलेच चर्चेत आले आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीकडे लक्ष वेधल आहे. त्यात म्हटले आहे की, सध्याच्या घडीला १३ मे चे आकडे घेतले तर देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी २२ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर, एकूण मृतांपैकी ३१ टक्के मृत्यूही महाराष्ट्रातूनच झाले व सक्रिय रुग्णही १४ टक्के असल्याचे म्हटले आहे.
त्याचप्रमाणे फडणवीस यांनी या पत्रात देशातील कोरोना स्थितीमध्येत महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असेही म्हटले आहे. या पत्राच्या सुरुवातीला फडणवीस यांनी पंतप्रधानांना लिहिलेली पत्र आणि काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावरुन काही महत्त्वाचे मुद्दे मांडत असल्याचे स्पष्ट केले आहे. या पत्राचा शेवट करतांना त्यांनी म्हटले आहे की जर महाराष्ट्रात परिस्थिती सुधारली तर देशातील इतर ठिकाणी काम करणे सोपे जाईल.
देशात रोज कोरोनामुळे चार हजार मृत्यू होत असून त्यात ८५० महाराष्ट्रात आहे. तरी सरकार आपली प्रशंसा करण्यात लागली आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रासह अन्य मागास असलेल्या भागाला देवाच्या भरोशावर सोडले आहे. येथे कोणती मदत दिली जात नाही. ग्रामीण भागात तर हॅास्पिटलमध्ये बेडस उपलब्ध आहे ना उपचार, रेमडेसिवीर व अॅाक्सिजनसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला आहे.
आता या पत्रानंतर महाविकास आघाडीचे नेते काय उत्तर देतात हे महत्त्वाचे आहे
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1393453796135632899?s=20