नवी दिल्ली – रशियानंतर आता अमेरिका, जपान आणि ब्रिटनमधील लसीलाही भारताने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. या लस आता आयात केल्या जाणार आहेत. देशातच विकसित केलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीनंतर केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक लसीला मंजुरी दिली आहे.
भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. त्यामुळे देशातील लसीकरणाला वेग देण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. यासाठीच परदेशी लसींना मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजप नेते व केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी या मागणीची खिल्ली उडवत राहुल गांधी हे परदेशी लसींसाठी लॉबिंग करीत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राजकारण तापले होते. अखेर केंद्र सरकारने देशांतर्गत लसीकरणाला वेग देण्यासाठी परदेशी लसींनी मान्यता देण्याचे पाऊल उचलले आहे. मान्यता दिलेल्या या परदेशी लसींचा वापर सर्वप्रथम १०० जणांवर केला जाणार आहे. त्यानंतर ७ दिवस तज्ञांचे लक्ष त्यावर असणार आहे. त्यानंतर या लसीचा वापर लसीकरण मोहिमेत केला जाणार आहे.
https://twitter.com/drharshvardhan/status/1381896951654846466?s=20