मुंबई – राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. सोबत माजी खासदार समीर भुजबळ देखील होते.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन विधासभेच्या अधिवेशनात भुजबळ व फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर या अधिवेशनात १२ आमदारांचे निलंबन सुध्दा झाले. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर दोन्ही पक्षातील नेते एकत्र येईल का असा प्रश्न होता. पण, भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर या विषयावर आता सत्ताधारी व विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.
भुजबळ व फडणवीस नाशिक येथे शहर बस सेवेच्या उदघाटन सोहळ्यासाठी एकत्र आले. त्यानंतर ते आज पुन्हा एकत्र आले आहे.