विशेष प्रतिनिधी, पुणे
कोरोना कालावधीत निरोगी राहण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. विशेषत : लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा त्रास असलेल्या लोकांना या विषाणूचा धोका जास्त असतो. यासाठी, डॉक्टर हृदय निरोगी ठेवण्याचा सल्ला देतात. कारण हृदयाला शरीराचा सर्वात महत्वाचा भाग मानले जाते. त्याचे मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचवणे होय. हृदयाला आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी रोज सकाळी उपाशी पोटी ‘ ह्या ‘ फळाचा रस प्यावा, कोणते आहे हे फळ जाणून घेऊ या…
हृदयला शरीराच्या सर्व भागांतून रक्त घ्यावे आणि दयावे लागते. तसेच रक्त पंप करण्याचे काम हृदय करते. या प्रक्रिये दरम्यान हृदय संकुचित होते आणि वाढते. या कार्यात अडथळ्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. यासाठी योग्य दिनचर्या हवी, योग्य आहार पाळा घ्यावा तसेच किवी या खास फळांचा रस दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावा.
रिसर्च गेटवर प्रसिद्ध झालेल्या संशोधनात या फळाचे तपशीलवार वर्णन केले आहे. संशोधनानुसार या फळात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषत: लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, तणाव आणि हृदयाशी संबंधित आजारांसाठी हे फळ फायदेशीर असून डॉक्टर अनेक लोकांना किवीचा रस पिण्याचा सल्ला देखील देतात.









