इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेमात फसवणुकीच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. कदाचित तुम्हीपण या टप्प्यातून आधीच गेला असाल. ही भावना आपल्याला अतिशय त्रासदायक ठरणारी असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अविश्वासू मुलीबद्दल सांगणार आहोत. तिच्याबद्दल व तिच्या प्रियकराबद्दल ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तसेच, प्रियकराबद्दल तुम्हाला आपुलकी वाटेल.
तर ही कथा आहे कॅलिफोर्नियातील एका तरुणाची. त्याचे एका मुलीवर खूप प्रेम होते. तिच्यासाठी तो काहीही करू शकतो, असे प्रेम. प्रेयसीसाठी त्याने आपल्या जीवाचीही कधी पर्वा केली नाही. मध्यंतरी झाले असे की, प्रेयसीच्या आईची किडनी खराब झाल्याचे त्याला कळले. आपल्या प्रेयसीचे दुःख कमी करण्यासाठी त्याने प्रेयसीच्या आईला आपली किडनी दान केली. पण असे असूनही, त्याच्या प्रेयसीने त्याची फसवणूक केली. तिने दुसऱ्याच मुलाशी लग्न केले.
प्रेमापायी किडनी दान केलेल्या या तरुणाने नाव आहे, उझील मार्टिनेझ. सोशल मीडियावर त्याने आपली ही व्यथा मांडली आहे. तो म्हणाला की, तो त्याच्या प्रेयसीवर खूप प्रेम करतो. तिला आनंद देण्यासाठी त्याने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. जेव्हा तिची आई आजारी पडली, तेव्हाही प्रत्येकक्षणी तो तिच्यासोबतच होता. जेव्हा आईला वाचवण्यासाठी एका किडनीची गरज आहे हे कळताच त्याने स्वतःची किडनी त्यांना दान केली. यानंतरही त्याच्या प्रेयसीने त्याची फसवणूक केली.
उझील मार्टिनेझ यांनी सांगितले की, तिच्या आईला किडनी दिल्यानंतर तिचे ऑपरेशन झाले. आई हळूहळू बरी होऊ लागली. हे सगळे होईपर्यंत त्याची प्रेयसी शांत होती पण एका महिन्यानंतर तिने उझीलसोबत ब्रेकअप केले आणि दुसऱ्याच मुलाशी लग्न करुन घेतले. उझीलने त्याच्या कथेचा व्हीडिओ टिकटॉकवर शेअर केला आहे.
उझील मार्टिनेझच्या व्हिडिओला १५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याची कहाणी ऐकून लोकांची किव आली. अनेकजण त्याच्या मैत्रिणीला शिव्या देत आहेत. यावर युजर्स म्हणतायेत की, किडनी देऊन तरुणाने प्राण वाचवले आहेत. त्यामुळे त्याने निराश निराश होऊ नये.