इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना संपला, अर्जेंटिनाने जेतेपद पटकावले आणि सगळ्यांच्या तोंडी केवळ मेस्सीचाच गजर आहे. पण यापेक्षाही चर्चेत आहे ती त्याची पत्नी एंटोनेला रोकुजो. अर्जेंटिना आणि फ्रान्समध्ये रंगलेल्या या रंगतदार सामन्यात लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने विश्वचषक आपल्या नावावर केला. २०१४ मध्ये भंगलेलं विजयाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच यावेळी मेस्सी मैदानात उतरला होता.
अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मेस्सीने त्याच्या खेळीने संपूर्ण वातावरणच भारून टाकले होते. लिओनेल मेस्सीचे जगभरात लाखो चाहते आहेत. फिफा विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर त्याच्या पत्नीने मेस्सीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्याला मेस्सीचा प्रचंड अभिमान असल्याचं ती सांगते. आजच्या यशामागे मेस्सीची अनेक वर्षांची मेहनत असल्याचंही एंटोनेलाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मेस्सी आणि एंटोनेला हे बालपणीचे मित्र आहेत. २००७ पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. पदवी मिळाल्यानंतर एंटोनेलाने डेन्टिस्टचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. परंतु, मेस्सीला पाठिंबा देण्यासाठी तिने आपले हे स्वप्न अर्धवटच सोडले. आणि त्याच्या स्वप्नांना स्वतःची स्वप्ने मानले. त्यानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल टाकलं. तिचं स्वत:चं बुटिकही आहे. एंटोलेना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे २४.६ मिलियन फॉलोवर्स आहेत. २०१७ मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांना थियागो, मोटेओ व सिरो ही तीन मुले आहेत.
Footballer Lionel Messi wife Dream Left