फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2022
१९३० साली सुरु झालेल्या आणि दर चार वर्षांनी फुटबॉलचा विश्वचषक होतो. यंदा हा महाकुंभ कतार येथे जून २१ ते जुलै १८ दरम्यान होत आहे. या २२ व्या स्पर्धेचा ड्रॉ आज संध्याकाळी (शुक्रवार, १ एप्रिल) यजमान कतारच्या राजधानी दोहा येथे होत आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला शोभेल अशा थाटामाटात हा ड्रॉ होईल. त्याकडे जगातील तमाम फुटबॉलप्रेमींचे लक्ष या सामन्यांइतक्याच महत्त्वाच्या ‘event’ कडे लागले आहे. त्यामुळे सर्व स्पोर्ट्स वाहिन्यांचे प्रतिनिधी दोहा येथे डेरा टाकून बसले आहेत. हा सोहळा नक्की कसा असतो, त्याचे महत्त्व काय, यंदाचे वैशिष्ट्य काय या सर्वांचा धांडोळा आपण घेणार आहोत…

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
एकूण २०६ सभासद असलेल्या जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) आठ वेगवेगळ्या विभागातून ३२ संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. ते प्रत्येकी चार या प्रमाणे आठ गटात विभागले जातील. लॉटस पाडताना अव्वल संघ एकाच गटात येणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत फक्त सातत्याने उत्तम खेळत असलेले संघच बाद फेरीत पोहोचतात आणि त्यामुळे स्पर्धेतील चुरस कायम राहते.
विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी जी पात्रता फेरी असते, ती स्पर्धेच्या दोन वर्षे आधी सर्व आठही विभागात सुरु होते. ती अतिशय प्रदीर्घ, आणि सर्वसामान्य माणसाला समजायला अवघड पण सर्व संघाना उत्तम न्याय देणरी आहे. या वर्षी कतार येथे होणाऱ्या स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी सर्व सभासद देश मिळून एकूण ८६० सामने खेळले आणि त्यात २४१५ गोल ( प्रति सामना २:८१ ) केले गेले.
१९ जून २०१९ साली सुरु झालेली पात्रताफेरी २९ मार्च २०२२ साली संपली. ३२ देशांपैकी २९ अंतिम फेरीत म्हणजे विश्वचषक स्पर्धेत खेळणारे देश निश्चित झाले. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने उरलेले तीन देश पात्रताफेरीचे काही सामने अचानक रद्द करावे लागल्याने अजून ठरले नाहीत. युध्द लवकरच संपेल या आशेवर ७ जून ते १५ जुन दरम्यान युक्रेनसह, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, पेरू, कोस्टा रिका आणि अरब अमिराती या पैकी तीन संघ या दरम्यान एकमेकांशी खेळून आपले नशीब अजमावतिल. अशारीतीने एकूण ३२ संघ विश्वचषक स्पर्धेत उतरतील, पैकी कतार हा यजमान देश असल्याने त्यांचे जागतिक रँकिंग ५२ इतके खाली असूनही ते थेट पात्र झाले आहेत !
आश्चर्य म्हणजे चार वेळा विश्वचषक जिंकणारा इटली स्पर्धेतून बाद झाला आहे ,तर क्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल अगदी शेवटच्या क्षणी पात्र झाला. ३२ पात्र संघात युरोपातील १३ देश आहेत कारण तेथे उत्तम खेळणारे जास्तीत जास्त देश आहेत. आशिया खंडातील चार देश ( या वेळी द कोरिया, इराण, जपान आणि साऊदी अरेबिया ) पात्र होतात तर पाचव्या संघाचे भवितव्य १४ जूनला ठरेल , तसेच उ अमेरिकन तीन देश पात्र झाले असले तरी चौथा देश याच तारखेला ठरेल . आफ्रिका खंडातील पाच देश आणि द अमेरिका खंडातील चार देश असा कोटा ठरलेला आहे.
फुटबॉलची लोकप्रियता आणि व्यावसायिक मूल्य कमालीचे वाढले आहे. त्यामुळेच १९७८ च्या आर्जेन्टिना येथील १६ संघ खेळले तर आता ३२ संघ विश्वचषकासाठी पात्र झाले आहेत. २०२६ साली अमेरिका खंडात होणाऱ्या पुढील विश्वचषक स्पर्धेसाठी ४८ संघ खेळणार आहेत. सरतेशेवटी जगातील सर्वोत्तम मानले गेलेले मेस्सी आणि रोनाल्डो हे कतारला आयुष्यातील शेवटची विश्वचषक स्पर्धा खेळतील.आजच्या फुटबॉल शौकीनांच्या गळ्यातील ताईत असलेले नेमार ( आर्जेन्टिना) ,एंबापे ( फ्रांस), हेन्री केन ( इंग्लंड), सादियो माने (सेनेगाल) इ यांचा खेळ मेस्सी आणि रोनाल्डोसह पाहण्याची सुवर्णसंधी यावेळी मिळणार आहे पण यांच्याइतकाच लिव्हरपूल संघाचा लोकप्रिय आणि गुणवंत खेळाडू मो किंवा मोहम्मद सलाह याचा कलात्मक खेळ मात्र फुटबॉलप्रेमी पाहू शकणार नाही. कारण त्याचा इजिप्त संघ अखेरच्या क्षणी त्याच्या लिव्हरपूलच्याच सादियो मानेच्या सेनेगाल कडून बाद झाला. कतारने स्पर्धेसाठी अतिशय आधुनिक सुविधायुक्त असे आठ भव्य स्टेडियम उभे केले आहेत जेथे तंत्रज्ञानाच्या आधारे संपूर्ण स्पर्धाभर २० डिग्रीच्या आसपास तापमान ठेवण्यात येणार आहे. स्पर्धा संपल्यानंतर त्यातील काही dismantle करता येतील असे आहेत तर काहीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत असे सांगण्यात आले आहे .