नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. श्रद्धेचा भाग म्हणून नवरात्रीच्या काळात उपवास करण्याची प्रथा आहे. या उपवासासाठी बऱ्याचदा भगरीचे सेवन केले जाते आता यासंदर्भात राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने महत्त्वाचे आवाहन केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
नागरिकांनो, भगर खरेदी करताना ही काळजी घ्या
– एक भगर व इतर पदार्थ खरेदी करताना परवानाधारक अथवा नोंदणी धारक व्यक्तींकडूनच खरेदी करावे
– पॅक बंद असलेले भगर किंवा उपवासाचे पदार्थ विकत घ्यावेत.
– भगरीच्या पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर इत्यादी तपासून खरेदी करावेत
– पॅकेटवर प्रक्रिया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले, याचा तपशील असतो. तो नीट पाहून घ्यावा. त्याशिवाय बेस्ट बिफोर म्हणजे भगरीची अंतिम वापरण्याची मुदत केव्हा कालबाह्य होते, तेही तपासून आणि खात्री करूनच खरेदी करावी.
– भगरीचे सुटे पीठ खुल्या बाजारातून किंवा हात गाडीवरून विकत घेऊ नये.
– बाजारातून पॅक बंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करून आणि नंतर स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतरच घरगुती पद्धतीने पीठ तयार करावे
– खरेदी केलेल्या भगरचे विक्रेत्याकडून पक्के खरेदी बिल घ्यावे.
– सकाळी बनविलेली भगर संध्याकाळी किंवा रात्री शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करण्यात येऊ नये.
– भगर आणि इतर उपवासाचे पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत. आणि ते करण्यासाठी पिण्या योग्य पाण्याचाच वापर करावा
Food Upavas Bhagar Nutrition Precaution
Navaratri Festival
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/