पुणे – कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली १० वर्षे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण अशा सर्वच क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम करण्यात येतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात यावर्षी ही संपूर्ण लोकडाऊन लागल्यामुळे बऱ्याच लोकांचे रोजगार गेले, रस्त्यावर राहणाऱ्या बेघर लोकांवर तर उपासमारीची वेळ आली. बरीच कुटुंबे जी छोटी – मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करतात अशा कुटुंबियांना तर कोरोनाची कमी आणि उपासमारीची जास्त भीती वाटू लागली, लहान मुले अबालवृद्धांची होत असलेली उपासमार बघून कोकण संस्थेने आपल्या फूड फॉर होमलेस या मोहिमेच्या अंतर्गत पुणे ,मुंबई येथील गरजू कुटुंबाना रेशन वाटप करण्याचे ठरवले.










