विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोणतीही गोष्ट खाण्याची खूप इच्छा होणे, म्हणजे फूड क्रेव्हिंग. हे जसे आवडत्या गोष्टींसाठी, खाद्यपदार्थांसाठी होते, तसे ते आणखी एका गोष्टीसाठी होते. ते म्हणजे, शरीरात काही पोषणतत्त्वांची कमतरता असणे. फूड क्रेव्हिंगमुळे केवळ वजनच वाढत नाही तर यामुळे टाईप – २ चा मधुमेहही होण्याची शक्यता असते. या आजारातून वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्हाला ज्या गोष्टी खायला आवडतात, त्याला रिप्लेस करतील असे काही पदार्थ आम्ही सुचवणार आहोत.
चिप्स
अनेकांना सकाळी किंवा संध्याकाळी उशीरा सॉल्टी चिप्स खाण्याची इच्छा होते. मग अशावेळी चिप्स, सामोसा आणि स्नॅक्स खातात. तुम्हाला जर असे वाटत असेल तर याचा एक अर्थ असा होतो की, संबंधित व्यक्ती तणावाखाली आहे. अशावेळी तेलकट किंवा सॉल्टी स्नॅक्स खाण्यापेक्षा बेक्ड पदार्थ खावेत.
चॉकलेट
चॉकलेट खावंसं वाटणं, म्हणजे हार्माेनलमध्ये काही ना काही बदल होणे. हे लक्षण विशेषत: महिलांमध्ये पिरीयड्सच्या आधी दिसते. याशिवाय मॅग्निशिअमच्या कमतरतेमुळे देखील ही इच्छा होऊ शकते. पण, चॉकलेट खाल्ल्याने कॅलरी वाढू शकतात. याऐवजी मिक्स्ड नट्स खाऊ शकता. यामुळे मॅग्निशिअमची कमतरता भरून निघेल आणि जिभेचे चोचले पुरवले जातील.










