अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बागलाणच्या पश्चिम पट्यातील हरणबारी धरण काल रात्री पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने मोसम नदीला मोठा पूर आला. मालेगाव शहराच्या मध्यातून मोसम नदी वाहत असल्याने दोन्ही बाजूला जोडणारा जुना सांडवा पुलावरून पुराचे पाणी वाहू लागला आहे. मोसमातील मोसम नदीला आलेला हा पहिलाच पूर असल्याने नदीत तयार झालेली पाणवेली बरोबरच अन्य कचरा वाहून गेला आहे. भुईकोट किल्ल्याला वळसा घालत पुढे जाणारी मोसम व गिरणा नदीचा संगम पुढे काही अंतरावर होत असल्याने नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.