मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे नवीन वर्षात मोबाईल, टॅब, लॅपटॉप, रंगीत, एलईडी टीव्ही, स्मार्ट टीव्ही यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र काही कंपन्यांच्या स्मार्ट टीव्ही मध्ये ग्राहकांना मोठी सूट मिळणार आहे. या सवलतीचा ग्राहकांना चांगला फायदा होऊ शकतो.
फ्लिपकार्ट ई-कॉमर्स कंपनी ही फ्लिपकार्ट टीव्ही डे सेलचे आयोजन करत आहे, त्यात 2022 ची पहिली विक्री ही 1 जानेवारीपासून सुरू झाली असून हा सेल 5 जानेवारी 2022 पर्यंत चालणार आहे. Flipkart Blaupunkt, MI, Samsung, Realme आणि OnePlus सारख्या लोकप्रिय ब्रँडवर 11,000 रूपयांपर्यंत सूट देत आहे, सोबत हा टीव्ही नो कास्ट EMI वर देखील आपण घेऊ शकता. आता फ्लिपकार्टवर मिळू शकणार्या सर्वोत्कृष्ट टीव्ही ऑफरची यादी अशी आहे…
Blaupunkt 43-इंच सायबर साउंड प्रीमियम 4K Android टिव्ही
Blaupunkt 43-इंचाचा 4K टीव्ही हा 27,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या टिव्हीमध्ये 3840 x 2160 च्या रिझोल्यूशनसह आणि सभोवतालच्या आवाजासह क्रिस्टल-क्लियर चित्र गुणवत्ता देण्यात येते. हा टीव्ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवरही काम करतो, त्यामुळे तुम्ही Google Play Store द्वारे अनेक अॅप्स आणि गेम्स ऍक्सेस करू शकता. यात 50W स्पीकर आउटपुट आहे ज्यामध्ये बेझल-लेस डिझाइन देखील आहे. यात डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस ट्रूसाऊंड प्रमाणित ऑडिओ आणि 4 स्पीकर यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यात डॉल्बी MS12 साउंड तंत्रज्ञान वापरले असून डॉल्बी अॅटमॉस डीकोड आणि वाढवता येऊ शकते.
सॅमसंग क्रिस्टल 4K 108 सेमी (43 इंच) अल्ट्रा एचडी, एलईडी स्मार्ट टीव्ही :
सॅमसंग कंपनीचा अल्ट्रा एचडी (4K) एलईडी स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्ट सेलवर 36,999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. हे मॉडेल 60Hz रिफ्रेश रेटसह देण्यात येते आणि त्याचे रिझोल्यूशन 3840 x 2160 आहे, त्यात PurColor, Motion Xcelerator आणि Crystal प्रोसेसर 4K तंत्रज्ञान आहे.
Mi TV 4X 43 इंच स्मार्ट टीव्ही :
Mi TV 4X सेलमध्ये 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. यात 60Hz रिफ्रेश रेटसह 43-इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले आहे. हा पॅच वॉल लाँचरसह Android TV 9.0 सह येतो. Mi TV 4X मध्ये Netflix, Prime Video आणि Disney+ Hotstar सारख्या लोकप्रिय OTT अॅप्सचाही समावेश आहे. हा टीव्ही 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅकसह देखील येतो.
)OnePlus Y सिरीज 108 सेमी स्मार्ट टीव्ही
वनप्लस टीव्हीचा 43-इंचाचा Y1 टीव्ही 26,999 रुपयांना उपलब्ध आहे. यात 43-इंचाचा फुल एचडी वाइड कलर अमेझिंग गॅमट डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 88.5 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह स्लिम बेझल-लेस डिझाइनमध्ये तयार केलेला आहे. या टीव्हीमध्ये 2 HDMI, वाय-फाय 2.4 GHz आणि ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटीसह 2 USB पोर्ट उपलब्ध आहेत. टीव्हीमध्ये दोन स्पीकर्ससह एकूण 20W चे साउंड आउटपुट आहे. ते डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करते.
Realme 108 cm (43 इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट टीव्ही :
Realme 4K TV Flipkart सेल दरम्यान 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून सर्व आवडते चित्रपट प्ले करताना ते प्रेक्षकांना एक इमर्सिव सिनेमॅटिक अनुभव देईल.