नवी दिल्ली – स्मार्ट फोनची खरेदी कधीही केली जाते. कोणत्याही काळात हमखास विक्री होणारे उत्पादन आहे ते. फ्लिपकार्टने असेच स्मार्ट फोन स्वस्तात उपलब्ध करून दिले आहेत. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजला २ मे पासून सुरुवात होणार असून हा सेल पाच दिवस म्हणजे ७ मे पर्यंत सुरू राहील. तर फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स १ मे पासूनच याचा फायदा घेऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टसह स्मार्टफोनवर तब्बल ८० टक्क्यांची सवलत दिली जात आहे. तर स्मार्ट टीव्हीवर ७५ टक्क्यांची सूट मिळणार आहे.
हे स्मार्टफोन स्वस्तात
सॅमसंग गॅलेक्सी एफ १२ स्मार्टफोन ९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. तर गॅलेक्सी एफ ४१ स्मार्टफोन १२ हजार ४९९ रुपयांत मिळेल. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज सुविधा असलेल्या फोनची ही किंमत आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजच्या फोनची किंमत १४ हजार ४९९ एवढी असेल. गॅलेक्सी एफ ६२ ची किंमत १७ हजार ९९९ आहे. तर ऍप्पल आयफोन ११ची किंमत ४४ हजार ९९९ एवढी आहे. याशिवाय आसूस, शाओमीचे स्मार्ट फोनचा देखील यात समावेश आहे.
खरेदीवर १० टक्के सूट
या सेलमध्ये समाविष्ट असलेले फोन एचडीएफसीच्या कार्डवरून खरेदी केले तर १० टक्क्यांची सूट मिळणार आहे. याशिवाय नो कॉस्ट ईएमआय आणि एक्स्चेंज ऑफरही दिली जात आहे. स्मार्टवॉचच्या खरेदीवर ६० तर टॅबलेटवर ४० टक्के सूट मिळते आहे.