पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फ्लिपकार्ट या ऑनलाइन खरेदी प्लॅटफॉर्मवर आजपासून (१२ मार्च) सेव्हिंग डे सेल सुरू झाला आहे. हा सेल १६ मार्चपर्यंत सुरू राहील. फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डे सेल फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी एका दिवसापूर्वीच म्हणजेच ११ मार्चला सुरू झाला आहे. सामान्य युजर्स बिग सेव्हिंग डेच्या निमित्ताने ११ आणि १२ मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत खरेदी करू शकणार आहेत. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, एसी आणि दुसरे उत्पादन खरेदी करण्याचा विचार तुम्ही करत असाल, तर डिस्काउंट मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
स्मार्टफोन
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेलमध्ये ओप्पो, सॅमसंग आणि अॅप्पलसह दुसऱ्या कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्यावर जबरदस्त ऑफर मिळत आहे. स्मार्टफोनवर ऑफर मिळविण्यासाठी १२ ते १६ मार्चपर्यंत खरेदी करण्याची आवश्यकता आहे. या ऑफरमध्ये एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यावर दहा टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे.
लॅपटॉप, स्मार्टवॉच
फ्लिपकार्डच्या या सेलमध्ये स्मार्टवॉचवर ६० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. तसेच ट्रिमरवर ७० टक्क्यांची सवलत मिळत आहे. तर लॅपटॉपवर ४० टक्क्यांपर्यंतची सवलत मिळत आहे. त्याशिवाय पोर्टेबल स्पिकर आणि हेडफोनसारख्या वनप्लस, बुट, जेबीएल, रिएलमीसह दुसऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांवर ८० टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे.
इतर वस्तू
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये होळी सणानिमित्तचे साहित्यही तुम्ही खरेदी करू शकणार आहे. यावर ८० टक्क्यांची सवलत, घर आणि स्वयंपाकघरातील गरजेच्या वस्तू ९९ रुपयांपर्यंत खरेदी करू शकणार आहात. तसेच फर्निचर, जिम, ग्रोसरी आणि इतर साहित्यावर चांगली सवलत मिळत आहे.
दररोज विशेष घोषणा
फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, बिग सेव्हिंग डे सेलमध्ये दररोज १२ AM, ८ AM आणि ४ PM वाजता विशेष डील घोषणा करण्यात येणार आहे. ही ऑफर १२ मार्च रोजी पहाटे ४ AM वाजता सुरू झाली आहे. या विशेष डीलमध्ये फर्निचर, फुटवेअर, कपडे आणि स्वयंपाकघरातील वस्तू, घरातील साहित्य खरेदी करू शकणार आहे.