मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पोको इंडिया या देशातील झपाट्याने विकसित होत असलेल्या ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने आज फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल २०२५ चा भाग म्हणून त्यांच्या लोकप्रिय स्मार्टफोन्ससाठी बहुप्रतिक्षित उत्सवी किमतीची घोषणा केली. पोको फेस्टिव्ह मॅडनेस मोहिमेसह ब्रँड अभूतपूर्व किमतींमध्ये प्रमुख नाविन्यता देण्यास सज्ज आहे, ज्यामुळे यंदा सणासुदीचा काळ खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतातील तंत्रज्ञानप्रेमींसाठी विशेष बनेल.
सेलला २२ सप्टेंबरपासून फक्त फ्लिपकार्ट प्लस व ब्लॅक सदस्यांसाठी लवकर सुरू होईल, ज्यानंतर २३ सप्टेंबरपासून सर्व ग्राहकांसाठी लाँच करण्यात येईल. मोठ्या सूट आणि एचडीएफसी, अॅक्सिस व आयसीआयसीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डसह जवळपास २,००० च्या बॅक ऑफर्ससोबत अतिरिक्त बचत, तसेच एक्स्चेंज ऑफर्ससोबत नो कॉस्ट ईएमआयचा लाभ ग्राहकांना घेता येईल.
पोको एम७ ५जी: पोको एम७ ५जी श्रेणीमधील सर्वात गतीशील ५जी स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये जवळपास १२ जीबी रॅम (६ जीबी टूर्बो रॅमसह), शक्तिशाली स्नॅपड्रॅगन® ४ जेन २ चिपसेट, ५० मेगापिक्सल सोनी कॅमेरा आणि सर्वोत्तम मनोरंजन अनुभवासाठी मोठे ६.८८ इंच एचडी+ डिस्प्ले आहे.
पोको एम७ प्लस ५जी: पोको एम७ प्लस ५जी हा श्रेणीमधील सर्वात मोठी ७००० एमएएच बॅटरी, १८ वॅट रिव्हर्स चार्जिंग, ६.९ इंच एफएचडी+ डिस्प्ले, जवळपास १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला पॉवरहाऊस आहे. हा स्मार्टफोन आता नवीन ४ जीबी रॅम व्हेरिएण्टमध्ये लाँच होत आहे.
पोको एक्स७ प्रो ५जी: श्रेणीमधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन १.७ दशलक्षहून अधिक अंतूतू स्कोअर संपादित करत आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८४०० अल्ट्रा चिपसेट आणि ६५५० एमएएच सिलिकॉन कार्बन बॅटरी आहे, तसेच वापरकर्त्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी ९० वॅट फास्ट चार्जर आहे.
पोको एफ७ ५जी: कार्यक्षमतेचा शोध घेत असलेल्यांसाठी डिझाइन करण्यात आलेला पोको एफ७ ५जी भारतातील सर्वात मोठ्या ७५५० एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी व अत्याधुनिक स्नॅपड्रॅगन® ८एस जेन ४ प्रोसेसरसह फ्लॅगशिप-लेव्हल क्षमता देतो. २.१ दशलक्षहून अधिक प्रभावी अंतूतू स्कोअरसह हा स्मार्टफोन विनासायास मल्टीटास्किंग, जलद अॅप लाँच आणि काम, मनोरंजनामध्ये अत्यंत सुलभ कार्यक्षमता देतो. ज्यामुळे स्मार्टफोनमधून अधिक क्षमतेची मागणी करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा स्मार्टफोन योग्य निवड आहे.
अद्वितीय कार्यक्षमता, अत्याधुनिक नाविन्यता आणि उत्सवी-केंद्रित किमतीसह पोको भारतातील तरूण, तंत्रज्ञानप्रेमी पिढीला यंदा बिग बिलियन डेज अधिक उत्साहात साजरा करण्यासाठी अधिक कारणे असण्याची खात्री घेत आहे. या घोषणेसह पोको भारतातील तरूण, तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांमध्ये उत्साह वाढवत आहे आणि २०२५ बिग बिलियन डेज सेल संस्मरणीय असण्याची खात्री घेत आहे.