शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आदिवासींच्या रुढी, परंपरांवर आधारीत ‘आदी महोत्सव २०२२’सुरू; असे आहे त्याचे वैशिष्ट्य

मे 28, 2022 | 10:12 am
in इतर
0
IMG 20220527 WA0041

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरी भागात आदिवासी जमात आदिवासी रूढी, परंपरा, कला लुप्त होतं चालली आहे. राज्यातील आदिवासी रूढी, परंपरा, कला व संस्कृतीचे संवर्धन आणि प्रचार व प्रसिद्धीच्या उद्देशाने नाशकात पाच दिवसीय ‘आदी महोत्सव २०२२’ सुरू झाला आहे. हा महोत्सव येत्या ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे.

आदिवासी आदर्श संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणेच्यावतीने हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव गोल्फ क्लब मैदान येथे पार पडणार आहे आणि या महोत्सवात आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा, लघूपट महोत्सवाचा समावेश आहे. याशिवाय आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणारे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ, दागदागिने, वारली चित्रकला, गवताच्या वस्तू, वेतकाम, बांबूकाम, काष्ठशिल्पे, धातुकाम, मातीकाम, वनौषधी व लाकडी लगद्याचे मुखवटे मोहसत्वाचे आकर्षण ठरणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले

“आदि महोत्सव – २०२२” अंतर्गत आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपारिक नृत्यस्पर्धा व आदिवासी जीवनावर आधारित लघुपट विनामुल्य पहता येणार आहेत. यावेळी, श्री. हिरालाल सोनवणे, आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, श्री. डॉ. राजेंद्र भारुड, आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, श्री विकास मीना ,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नाशिक ,श्री संदीप गोलाईत, अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक श्री. हंसध्वज सोनवणे, उपसंचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे , श्री. विजय डगळे, सांस्कृतिक अधिकारी ,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते,

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून एकूण १०० आदिवासी हस्तकलाकारांना व ५०० नृत्यकलाकार आमंत्रित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात वारली चित्रकला, बांबूच्या व वेताच्या वस्तु, धातूच्या कलाकुसरीच्या वस्तु, आदिवासी दाग-दागिने, कांगदी लगद्याचे व लाकडाचे मुखवटे, इत्यादी हस्तकला वस्तूंचा प्रदर्शनात समावेश आहे. आदिवासी पारंपारिक नृत्यस्पर्धेसाठी प्रकल्प स्तरावरील उत्कृष्ठ नृत्यपथकांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. नृत्यस्पर्धा कार्यक्रम पण महोत्सवात होणार आहे.

आदिवासी महोत्सवा दरम्यान संस्थेने तयार केलेले आदिवासी कला, संस्कृती व जीवन तसेच आदिवासींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यावर आधारित लघुपट दाखविले जाणार आहेत. सर्व नागरिक, कला समिक्षक, संग्राहक, कलाप्रेमी , लघुपट रसिक यांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ही अमूल्य संधी देण्यात आली आहे. सदरचे प्रदर्शन बघण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

आपल्या प्रास्ताविकामध्ये आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणेचे आयुक्त डॉ राजेंद्र भारुड म्हणाले की, राज्यात ९ ते १० टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या संस्कृती जतन व विकास यासाठी आदिवासी विभाग काम करते. या संस्कृतीची ओळख शहरवासियांना व्हावी आणि आदिवासींना रोजगार व व्यवसाय मिळावा हा अशा प्रकारच्या महोत्सवांचा उद्देश असतो. आदिवासी उत्पादन सोबतच राज्याच्या विविध भागातील आदिवासींच्या नृत्य स्पर्धेचे देखील महोत्सवादरम्यान आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील आदिवासी परंपरेचा अनमोल ठेवा असणारे कॉफी टेबल बुकचे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्री नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य पुढे म्हणाले की, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे च्या विविध उपक्रमांमुळे आदिवासी समाजाला अनेक रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचे व्यासपीठ मिळत असून नाशिकमध्ये भरलेल्या या आदि महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागांतून आदिवासी बांधव सह्भागी झाले आहेत. नाशिक मध्ये भरलेल्या या महोत्सवात नाशिककर तसेच आदिवासी समाजाने प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

जंगलात सापडणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये आपल्या कला आणि कौशल्याने रंग भरणारा आदिवासी समाज हा सचोटीने व्यवसाय करतो. सोबतच त्यांनी विक्री कौशल्य आत्मसात केल्यास उद्योजक बनण्याची त्यांना मोठी संधी आहे तसेच आदिवासी समाजासाठी वेगळी एमआयडिसी ची घोषणा लवकरच राज्य शासनातर्फे करण्यात येईल असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. आदिवासी विकास आयुक्तालय आयुक्त श्री हिरालाल सोनवणे यांनी आदिवासींच्या विकासाकरता, कला-संस्कृती ,रूढी परंपरा यांच्या संवर्धन करता राबवण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव हस्तकला प्रदर्शनाचे महत्व विषद केले ,कार्यक्रम करिता उपस्थित मान्यवरांचे आभार श्री हंसध्वज सोनवणे ,सहसंचालक आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांनी केले,,आदी महोत्सव 2022 नाशिक उद्घाटन समारंभ संपन्न झाल्याचे मा अध्यक्ष महोदय यांच्या मान्यतेने घोषित करण्यात आले,

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय सांगता! चक्क घरबसल्या मिळणार तब्बल ३५ लाखांचे कर्ज; फक्त हे करा

Next Post

बनावट वीजबिल, आधार आणि पॅनकार्ड द्वारे नोंदणी प्रमाणपत्र; मुंबईतून दोघांना अटक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

बनावट वीजबिल, आधार आणि पॅनकार्ड द्वारे नोंदणी प्रमाणपत्र; मुंबईतून दोघांना अटक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011