नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना केंद्र सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. Incovac ही नाकावाटे घेतली जाणारी पहिली कोविड लस लॉन्च करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही लस लॉन्च केली. हे स्वदेशी लस भारत बायोटेकने उत्पादित केली आहे.
कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी घोषणा केली होती की प्रजासत्ताक दिनानिमित्त कंपनी ही लस लॉन्च करेल. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, भारत बायोटेकने सरकारला प्रति लस ३२५ रुपये आणि खासगी लसीकरण केंद्रांना प्रति शॉट ८०० रुपये या दराने लस विकण्याची घोषणा केली होती.
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन (WUSM) च्या सहकार्याने भारत बायोटेकने नाकावाटे घेण्याची लस विकसित केली आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही कोरोनाची पहिली स्वदेशी लसही तयार केली होती. भारत बायोटेकने या नाकावरील लसीला iNCOVACC असे नाव दिले आहे. यापूर्वी याचे नाव BBV154 असे होते. ही लस नाकातून शरीरात पोहोचवली जाते. ही लस शरीरात प्रवेश करताच कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण दोन्ही रोखते.
यापूर्वी, ६ सप्टेंबर रोजी, DGCI ने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी आपत्कालीन वापरासाठी, Intranasal COVID-19 लस, Incovac ला मान्यता दिली होती. भारत बायोटेकने डीजीसीआयकडून इंट्रानेसल हेटरोलॉजस बूस्टरसाठी बाजार अधिकृततेसाठी अर्ज केला होता. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ही लस बूस्टर म्हणून दिली जाईल. प्रत्येक व्यक्तीला त्याचे चार थेंब दिले जातील.
https://twitter.com/mansukhmandviya/status/1618562562509131777?s=20&t=LrAWTpn0X_gQzFo_meoOhg
First Nasal Vaccine Launch on Republic Day